Jalgaon News : भुसावळ, चोपडा, चाळीसगावला अतिवृष्टी! रिपरिपीने जनजीवन विस्कळित

Jalgaon News : गेल्या २४ तासांत ३१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारपासून पावसाने उघडीप दिली. यामुळे नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती.
Heavy Rain
Heavy Rainesakal
Updated on

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात रविवार (ता. १४)पासून पावसाचा जोर कायम होता. रविवारी रात्रीही दमदार पाऊस झाला. सोमवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास भुसावळ शहरात ढगफुटीसदृश्‍य पाऊस झाला. ३० मिनिटांत २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत चोपडा, चाळीसगाव, पारोळा तालुक्यांतील काही मंडलात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या २४ तासांत ३१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारपासून पावसाने उघडीप दिली. यामुळे नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. (Jalgaon Heavy rain in Bhusawal Chopra Chalisgaon)

महामार्गावर काही दिसेनासे

सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास भुसावळ शहरासह परिसरात अचानक अंधारून आले. त्यानंतर लागलीच मुसळधार पावसास सुरवात झाली. जोरदार पावसाने समोरचा व्यक्तीही दिसेनासा झाला होता. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना वाहनाचे दिवे, इंडीकेटर लावून वाहन चालवावे लागत होते. दुचाकीस्वारांना वाहनच चालविता येत नव्हते. एवढा धुव्वाधार पाऊस सुरू होता. अर्धा ते पाऊणतास झालेल्या जोरदार पावसाने महामार्गावर व सर्व्हिस रोडवरही पाणी साचले होते. (latest marathi news)

Heavy Rain
Mumbai Heavy Rains: विक्रमी पाऊस पडल्यामुळे मुंबईत पाणी साचलं, तरी निचरा वेगाने; CM एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं

२४ तासांत पडलेला पाऊस

तालुका--मिलिमीटर

जळगाव--२७.६

भुसावळ--३१.५

यावल--२४.४

रावेर--२३.३

मुक्ताइनगर--९.८

अमळनेर--२१.८

चोपडा--२७.४

एरंडोल--३९.०

पारोळा--७१.३

चाळीसगाव--५३.३

जामनेर--२६.४

पाचोरा--३४.३

भडगाव--२९.५

धरणगाव--२५.४

बोदवड--२९.४

एकूण--३१.४

अतिवृष्टी झालेली मंडले

*गोरगावले (ता. चोपडा)--८४.३

*उत्राण (ता. एरंडोल)--७७.५

*तामसवाडी (ता. पारोळा)--८९.८

*बहादरपूर (ता.पारोळा)--७७.५

*तळेगाव (ता. चाळीसगाव)--७५

*हताळे (ता. चाळीसगाव)--८६.८

Heavy Rain
Jalgaon Heavy Rain Damage : सर आली धावून... फुपनगरी-वडनगरी रस्ता गेला वाहून! जिल्ह्यात 7 मंडलांमध्ये अतिवृष्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.