Jalgaon Monsoon : तालुक्यातील जवखेडा, आंचलवाडी शिवारात अतिवृष्टीमुळे कित्येक एकर शेती वाहून गेली आहे. नाले तुडुंब वाहिले तर विहिरी जमीन पातळीवर भरल्या होत्या. अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जवखेडा, आंचलवाडी गावशिवारात गुरुवारी (ता. २७) सायंकाळी अतिवृष्टी झाली. जवखेडा येथे ग्रामपंचायतजवळ गावदरवाजाच्या बाहेर नाल्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावात प्रवेश करणे अवघड होते. (Heavy rain in Jamkhed Anganwadi Shivar has washed away agriculture in many places )
पेरणी होऊन पिके उगवली होती. मात्र अतिवृष्टीने पिके तर काही शेतातली माती देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात शुक्रवारपर्यंत (ता. २८) १८९.५१ मिमी पाऊस झाला आहे. आठ दिवसांपूर्वी लोंढवे, निसर्डी, खडके, वाघोदे भागात जशी अतिवृष्टी झाली तशीच अतिवृष्टी जवखेड्याला झाली.
मात्र जवखेड्याचे महसूल मंडळ वावडे असून, त्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणा असल्याने तेथे ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. महावेध आणि महसुलाच्या यंत्रणेत देखील मोठी तफावत आढळून आली आहे. अमळनेर मंडळात ३६ मिमी, शिरूड मंडळात ३४ मिमी, पातोंडा मंडळात २१ मिमी, मारवड मंडळात १६, नगाव १०, अमळगाव २५, भरवस ३६ , वावडे ४० मिमी असा पाऊस पडला आहे. (latest marathi news)
नोंदीतील त्रूटींकडे दुर्लक्ष
महावेधच्या पावसाच्या नोंदीतील त्रुटी यापूर्वी राजकीय पक्षासह जाणकारांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या होत्या. या त्रुटींची प्रशासनाने दखल घेत संबंधित विभागाचे अधिकारी महसूल मंडळात पाहणी करणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु नोंदीतील त्रुटी कायम आहेत. ६५ मीमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास तो अतिवृष्टी म्हणून ग्राह्य धरला जातो. याच नोंदीच्या आधारावर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. परंतु चुकीच्या नोंदीमुळे शेकडो शेतकरी भविष्यातील मदतीपासून वंचित ठरू नये, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी पंचनाम्यासाठी पथक पाठविले होते. तलाठी स्वप्नील कुलकर्णी, कृषी सहाय्यक दीपाली सोनवणे, ग्रामसेवक न्हायदे यांनी संयुक्तिकरित्या प्राथमिक पंचनामा केला. सुनील गुलाबराव पाटील, राजेंद्र भटा पाटील, रमेश भुरा पाटील यांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसऱ्या दिवशी देखील शेतांमध्ये पाणी साचलेले होते. या वेळी उपसरपंच जिजाबराव पाटील, माजी सरपंच नेताजी पाटील, प्रशांत पाटील, कोतवाल दिलीप पाटील, मयूर गोसावी, ज्ञानेश्वर पाटील, भूषण जैन उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.