Jalgaon News : वन्य प्राण्यांचा हल्ल्यात 25 लाखांपर्यंत मदत; पाणी, अन्नाच्या कमतरतेने प्राण्यांची गावाकडे धाव

Jalgaon : जिल्ह्यात विविध प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी होतात. विशेषत: उन्हाळ्यात जंगलात पाण्याची सोय नसल्याने प्राणी शहराकडे धाव घेतात.
Leopard, tiger, bear
Leopard, tiger, bearesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात विविध प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी होतात. विशेषत: उन्हाळ्यात जंगलात पाण्याची सोय नसल्याने प्राणी शहराकडे धाव घेतात. शेतही आता ओसाड झाले आहेत. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. शेतात उभी पिके काढण्यासाठी गेले असता, अनेक शेतमजूर, महिलांच्या अंगावर प्राणी धावून जातात. त्यांना जखमी करतात. वेळप्रसंगी जोरदार हल्ल्यात शेतकरी व मजूर दगावतात. ( Help up to 25 lakhs in wild animal attack )

अशा दगावलेल्या नागरिकांच्या वारसाला वन विभागाकडून २५ लाखापर्यंत मदत मिळते. पूर्वी ही मदत कमी होती. सध्या कडक उन्हाळ्यामुळे चोरवड, कुऱ्हे पानाचे, चाळीसगाव पट्ट्यातील अनेक गावांत बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्यासह इतर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत राज्य सरकारने वाढ केली आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृताच्या वारसास २५ लाखांपर्यंत मदत देण्यात येणार आहे.

विचाराधीन होती मागणी

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास किंवा हल्ला झाल्यास संबंधितांनी दिली जाणारी आर्थिक मदत कमी होती. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरूपी गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी व्यक्तीला दिला जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी राज्य सरकारच्या विचाराधीन होती.

अशी मिळते मदत

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमींना दीड लाखापर्यत मदत त्यांच्या थेट खात्यामध्ये मिळते. मृताच्या वारसाला २० पैकी १० लाख धनादेशाद्वारे व २० लाख खात्यात डिपॉझीट मिळते. (latest marathi news)

Leopard, tiger, bear
Jalgaon News : सरकारी योजनांचे पैसे लवकरच लाभार्थ्यांना ‘युपीआय’मार्फत!

पीक नुकसान झाल्यास किती मदत?

वन्य प्राण्यांनी शेतात पिकांचे नुकसान केल्यास वन विभागाकडून नुकसानीची पाहणी केली जाते. नुकसनीच्या प्रमाणात शेतकऱ्यास भरपाई देण्यात येते. त्यासाठी शेतकऱ्याने अर्ज करणे गरजेचे आहे.

कोणाला कसे कळवाल?

घटनेनंतर गावातील वनमजुरामार्फत वनरक्षकांना कळवावे. नंतर वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी येऊन त्याची पाहणी व पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल पाठवतील. त्यानंतर त्यांच्या वारसाच्या खात्यात थेट मदत देण्यात येईल.

घटनेनंतर ४८ तासात कळविणे आवश्यक

वन्य प्राण्याकडून कुठलाही हल्ला किंवा पिकांचे नुकसान झाल्यास वन विभागाला ४८ तासांच्या आत कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर वन विभागाकडून पुढील प्रक्रिया करण्यात येते.

दोन जणांना मदत

अडावद (ता. चोपडा) येथे मागील वर्षी अस्वलाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना प्रत्येकी वीस-वीस लाखांची मदत दिली असल्याची माहिती यावलचे उपवनसरंक्षक जमीर शेख यांनी ‘सकाळ’ला दिली.

Leopard, tiger, bear
Jalgaon News : मोठा वाघोदा येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण; 20 ते 22 ग्रामस्थांवर उपचार सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.