Jalgaon News : मान्यता रद्द झालेल्या ‘प्रताप’मधील ‘त्या’ 17 शिक्षकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

Jalgaon News : अपप्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठविणार असल्याचा इशारा शिक्षक नेत्यांनी पत्रकार परिषदेत देत मान्यता रद्द झालेल्या प्रताप महाविद्यालयातील १७ शिक्षकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
High Court
High Courtesakal
Updated on

Jalgaon News : शिक्षण क्षेत्रात असंतोष, भीती व दहशत निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठविणार असल्याचा इशारा शिक्षक नेत्यांनी पत्रकार परिषदेत देत मान्यता रद्द झालेल्या येथील प्रताप महाविद्यालयातील १७ शिक्षकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. (High Court relief to 17 teachers of Pratap whose accreditation was revoked)

सोबतच शिक्षकांचे वेतन नियमित सुरू ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती शिक्षक नेते प्रा. अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील मराठा मंगल कार्यालयात गुरुवारी (ता.११) ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ‘त्या’ १७ कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित सुरू ठेवावे, असे निर्देश देऊन यापुढे १७ शिक्षक व चार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेबाबत ढवळाढवळ न करण्याचे निर्देशदेखील उच्च न्यायालयाने दिले आहेत.

अशी माहिती कायदेशीर सल्लागार ॲड. किरण पाटील यांनी दिली. यावेळी प्रा. अशोक पवार व खानदेश शिक्षण मंडळाचे माजी सेक्रेटरी प्रा. सुनील गरुड यांनी माहिती देऊन तक्रारदारांवर गंभीर आरोप केले. दरम्यान, १८ जून २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईचे अध्यक्ष डॉ. श्रीराम पानझडे यांनी प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाच्या १८ उपशिक्षकांची मान्यता काढून टाकण्याचे पत्र दिले होते.

या निर्णयाविरोधात प्रताप महाविद्यालयातील या १७ शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. दरम्यान, यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रताप कनिष्ठ महाविद्यालयात १८ शिक्षकांची पाच जानेवारी २०१७ रोजी नियमानुसार नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी मान्यता दिली होती. (latest marathi news)

High Court
Jalgaon News : शाळेच्या पटांगणात खेळताना नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू!

१८ शिक्षकांचा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यावर प्रताप महाविद्यालयाने कायम मान्यता दिली आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने शालार्थ प्रणालीप्रमाणे १८ शिक्षकांचे वेतन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीदेखील याबाबत तक्रारदार लोटन चौधरी व दिलीप जैन यांनी यांनी १८ उपशिक्षकांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

सूडबुद्धीने तक्रारदार शिक्षकांना व संस्थेला त्रास देत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. सदर पत्रावर शिक्षक नेते प्रा. अशोक पवार, कायदेशीर सल्लागार ॲड. किरण पाटील, शिक्षक प्रतिनिधी प्रा. स्वप्निल पवार व अमोल पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

माजी आमदार, संचालकांशी वाद

या पत्रकार परिषदेत मलाही बोलायचे आहे, असे खानदेश शिक्षण मंडळाचे माजी संचालक तथा माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी सांगितले. मात्र, त्यास प्रा. अशोक पवार यांनी विरोध केला. त्यामुळे पत्रकार परिषदेत थोडा वाद होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, उपस्थितांनी दोघांची समजूत काढल्याने वाद संपुष्टात आला.

High Court
Jalgaon News : राज्यातील सर्वच कारागृह हाउसफुल : डॉ. सुपेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.