Jalgaon Road Accident : वाढती गुन्हेगारी आणि रस्त्यांवर होणारे अपघाती मृत्यू म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख झाली आहे. मुक्ताईनगर ते पारोळा या मुंबई- नागपूर महामार्गावर पावलोपावली अपघातप्रण क्षेत्र तयार झाले असून, जळगाव-अजिंठा हा मार्गही आता मृत्यूसाठी कुप्रसिद्ध होतोय.. या दोन्ही महामार्ग वगळता जिल्ह्यात येणारे व तालुक्यांना जोडणारे प्रमुख रस्तेही आता मरणास कारणीभूत ठरू लागले आहेत.
जानेवारी ते एप्रिल या अवघ्या १२० दिवसांत घडलेल्या २३४ अपघातात १८७ निरपराधांचा मृत्यू ओढवला तर, १९८ जायबंदी झाले. अपघातदर ४४ टक्क्यांनी वाढला असून, जळगावच्या रस्त्यावर मृत्यूची देवता यमाचे वास्तव्य आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (highway accident increased death rate rose)