Jalgaon Accident News : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर पावसामुळे दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. ‘खड्ड्यात महामार्ग, की महामार्गात खड्डे’, अशी परिस्थिती महामार्गाची झाली आहे. महामार्गासोबतच कालिंकामाता मंदिर ते तरसोद फाटा, खोटेनगर ते बांभोरीपर्यंतचा रस्ता जीवघेणा ठरत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे त्याकडे साफ दुर्लक्ष असल्याने वाहनधारकांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे. (Highway has become death trap neglect of National Highway Authority )
याचा लोकप्रतिनिधींनी संबंधितांना जाब विचारणे गरजेचे आहे. शहरात गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. यामुळे रस्त्यांवर खड्डे पडणे साहजिक आहे. खड्डे बुजविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. कंत्राटदारावर नियंत्रणाची जबाबदारी महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. (latest marathi news)
मात्र, अर्थपूर्ण संबंधामुळे दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे. दिवस पावसाने उघडीपही दिली होती. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराने खड्डे बुजवून रस्ता चांगले करणे गरजेचे होते. महामार्ग व त्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे.
दिशा समितीची आज बैठक
केंद्रीय योजनांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (ता. ३) सकाळी अकराला जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिशा समितीची बैठक होणार आहे. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केंद्राच्या अखत्यारितला विषय आहे. त्यावर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी संबंधितांना जाब विचारून राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, अपूर्ण कामाचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.