Jalgaon Holi Festival : रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा करा वापर : तज्ज्ञांचे आवाहन

Jalgaon Holi Festival : होळीच्या दिवशी येणाऱ्या पौर्णिमेला ‘पुनवेचा चंद्र’ म्हणतात. यादिवशी वाईट गोष्टींची आहुती देऊन नवीन सुरुवात केली जाते.
Holi Colour
Holi Colouresakal
Updated on

Jalgaon Holi Festival : होळीच्या दिवशी येणाऱ्या पौर्णिमेला ‘पुनवेचा चंद्र’ म्हणतात. यादिवशी वाईट गोष्टींची आहुती देऊन नवीन सुरुवात केली जाते. निसर्गात देखील नवीन बदलला सुरुवात होते. या उत्सवात रंगाची उधळण करण्याची परंपरा आहे. हा सण साजरा करताना रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. पूर्वी लोक फुलं किंवा त्यांच्यापासून बनवलेल्या रंगांनी होळी खेळत असत, परंतु आज रासायनिक रंगांचा वापर केला जातो. (Jalgaon Holi Festival Experts appeal Use natural colors instead of chemical colors)

त्यात लीड ऑक्साइड, क्रोमियम आयोडाइड, कॉपर, सल्फेट, शिसे आणि अॅल्युमिनियम ब्रोमाइड सारखी रसायनामुळे आरोग्याचे मोठे नुकसान होवू शकते. रासायनिक रंगांतील सिलिका आणि केसांचे शिसे डोळ्यांत गेल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते. डोळ्यांच्या बाहुल्यांना त्रास होऊ शकतो.

डोळ्यांना खाज सुटू शकते. रंग तोंडात गेले तर पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि पोटात संसर्ग यांसारख्या समस्या त्रास देऊ शकतात. रासायनिक रंगांनी होळी खेळल्याने अंगावर पुरळ, जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणा येऊ शकतो. अनैसर्गिक रंगांमुळे त्वचेचे आणि नुकसान होते.

चांदीसारख्या रंगामुळे कर्करोगाचा धोका बळावतो. लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण रंग खेळल्यावर त्यांच्या नखात अनेकदा रंग अडकून राहतो. त्याच हाताने त्यांनी काही खाल्ल्यास त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. (latest marathi news)

Holi Colour
Holi 2024 : होळीच्या दिवशी न विसरता या ५ शुभ वस्तू आणा, चारही दिशांनी होईल धनवर्षाव

रंगामध्ये रासायनिक द्रव्ये असतात. काहींमध्ये तर तांबे, शिसे, चांदी, ऍल्युमिनिअम व आयोडीनही असते. अशा रासायनिक रंगांमुळे केसांचे नुकसान होते. केस केवळ पांढरे होत नाहीत, तर केस दुभंगणे, केस तुटतात.

असे तयार करा नैसर्गिक रंग

* लालसर चंदन पावडर ही एक उत्तम पर्याय असू शकते.

* विटाचे पाणी हाही एक चांगला ओला रंग आहे.

* पालकाच्या पानाच्या कोरड्या पावडरीपासून हिरवा रंग होतो.

* हळद पावडरने पिवळा रंग तयार करा

* वाळलेली झेंडूची फुले व त्यांची पेस्ट किंवा लाल जास्वंद हीसुद्धा अनैसर्गिक रंगासाठी उत्तम पर्याय आहे.

* खेळण्यासाठी नेहमी हर्बल कलर्सचा वापर करा.

Holi Colour
Holi 2024 : होलिका दहनानंतर मुठभर राख बदलू शकते तुमचं नशीब, लगेच करा हा एक उपाय

"डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी चष्मा वापरावा. रासायनिक रंगांपासून चेहरा, त्वचेचे रक्षण करण्यासाठी खेळण्यापूर्वी अंगाला तेल लावावे. चुकून डोळ्यात किंवा तोंडात रंग गेल्यास लगेच पाण्याने धुवा किंवा गुळण्या करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या." - डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव

अशी घ्यावी काळजी...

रंग दुसऱ्याच्या डोळ्यात, कानात रंग जाणार नाही, याची काळजी घ्यावी. ऍलर्जी असल्यास योग्य उपचार घ्यावेत. रंग खेळताना शरीराचा अधिकांश भाग झाकला जाईल, असे सुती कपडे घालावेत. केसाला व त्वचेला खोबरेल तेल लावावे. डोक्यावर पाणी घेण्याआधी उडालेला रंग झटकून टाका. रंग काढण्यासाठी त्वचेवर रॉकेलचा वापर करू नका.

त्याऐवजी दुधात सोयाबीनचे पीठ किंवा बेसन पीठ घालून ते हात, पाय आणि चेहऱ्याला लावावे. केस कोमट पाण्याने, सौम्य अशा शाम्पूने धुवावेत. त्यानंतर केसांना कंडिशनर लावा. प्रवासादरम्यान गाडीच्या काचा शक्यतो बंद ठेवा. ओल्या जमिनीवर धावणे किंवा रंग खेळणे टाळा.

Holi Colour
Jalgaon Lok Sabha Election 2024 : पश्चिम भाग लाल दिव्यापासून वंचितच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.