Jalgaon Monsoon : शहरासह तालुक्यात सप्टेंबर महिना सुरू झाला तोपर्यंत पावसाने शंभरी ओलांडली आहे. वार्षिक ६७० मिमी पाऊस अपेक्षित असताना ७६६ मिमी म्हणजे ११४ टक्के पाऊस झालेला आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील चौबारी येथे दोन घरे पडून नुकसान झालेले आहे. शिवाय अतिपावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. जून महिन्याच्या सात तारखेपासून सतत पाऊस सुरू आहे. (House collapse in Chobari due to heavy rain )