जळगाव : रिंगरोडवर बांधकाम सुरू असलेल्या घरी पाणी भरण्यासाठी निघालेल्या सद्गुरु नगरातील दाम्पत्याच्या दुचाकीला अजिंठा चौकात वाहनाने धडक दिली. या विचित्र अपघातात महिलेचे शीर धडावेगळे होऊन पती गंभीर जखमी झाला आहे. अनिता सुनील राणे असे मृत महिलेचे नाव असून, अपघातानंतर वाहनधारक पसार झाला. हा अपघात बुधवारी (ता. ९) पहाटे तीनच्या सुमारास झाला. जुन्या औद्योगिक वसाहत परिसरातील सदगुरु नगरात अनिता व पती सुनील राणे, मुलगा तन्मय, मुलगी आदिती यांच्यासह वास्तव्यास आहेत. (housewife who wants to fill water lost her life in Ajanta Chowk )
रिंगरोड येथे त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून, बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास बांधकामावर पाणी भरण्यासाठी पती सुनील बाबुराव राणे हे अनिता यांना दुचाकीने घेऊन घरून निघाले होते. अजिंठा चौकातून दुचाकीने जात असताना समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाने राणे दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अनिता राणे यांचे डोके थेट धडापासून वेगळे झाले. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर पती सुनील राणे यांनाही मार लागला.
बराच वेळ पती-पत्नी रस्त्यावर पडून
पहाटेची वेळ असल्याने महामार्गावर सहसा लांब पल्ल्याच्या अवजड वाहनांचीच वाहतूक सुरू होती. तर, महामार्गाच्या दुतर्फा निर्मनुष्य परिसर असल्याने बराच वेळ अपघातानंतर मदत मिळू शकली नाही. पण, अजिठा चौकातील रिक्षास्टॉपवर एका रिक्षा चालकाला अपघात झाल्याचे दिसल्याने त्याने तत्काळ एमआयडीसी पोलिसांना फोन करून घटना कळविली. ड्यूटीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीसह मृत महिलेला उचलून जिल्हा रुग्णालयात हलविले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुचाकीला धडक देणाऱ्या वाहनाचा शोध
राणे दाम्पत्याच्या दुचाकीला धडक देत फरार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलीत करण्यास सुरवात केली असून, त्या आधारे संशयित वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.