Jalgaon Encroachment : हॉकर्स, महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड वादावादी; लोटगाड्यांचे अतिक्रमण काढण्यावरून वाद

Jalgaon Encroachment : महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाने गुरुवारी (ता. ५) अतिक्रमित गाड्यांवर कारवाईचा बडगा उचलला.
Hawkers, an ongoing dispute among municipal employees. In the second and last photo, the staff impounding the cars.
Hawkers, an ongoing dispute among municipal employees. In the second and last photo, the staff impounding the cars.esakal
Updated on

Jalgaon Encroachment : महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाने गुरुवारी (ता. ५) अतिक्रमित गाड्यांवर कारवाईचा बडगा उचलला. त्यास मसाला गल्ली, फ्रुट गल्लीतील हॉकर्सनी विरोध केला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. कर्मचाऱ्यांना मारण्यास धावले. त्यावरून वादावादी होऊन वातावरण तापले होते. पोलिसांना बोलाविण्याची वेळ आली होती. मात्र, काही हॉकर्सनी मध्यस्थी करीत गाड्या हटविल्या. यामुळे हॉकर्स व महापालिका कर्मचारी यांच्यातील वाद शांत झाला. (Huge dispute between hawkers and municipal employees due to encroachment)

शहरातील मसाला गल्ली, फ्रुट गल्ली, महात्मा गांधी मार्केट, गणेश कॉलनी, पांडे चौकात अनेक ठिकाणी हॉकर्सच्या गाड्यामुळे वाहतुकीला प्रचंड त्रास होतो. अनेक वेळा महापालिकेने संबंधित हॉकर्सला वाहतुकीला अडथळा होईल, अशा गाड्या लावू नका, असे सांगितले होते. मात्र, हॉकर्स ऐकत नव्हते. त्यामुळे गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात अनेक ठिकाणी कारवाई करीत गाड्या जप्त केल्या. गणेश कॉलनी रोड मोकळा केला. (latest marathi news)

Hawkers, an ongoing dispute among municipal employees. In the second and last photo, the staff impounding the cars.
Jalgaon Encroachment : राखीव 42 हेक्टर जंगलावरील अतिक्रमणावर बुलडोझर; वन विभागाची मोठी मोहीम

१३ लोटगाडी, शिवाजीनगरातील तीन गाड्या जप्त केल्या. महात्मा गांधी मार्केट रस्त्यावरील अतिक्रमीत गाड्या उचलून रस्ता मोकळा केला. महापालिकेच्या उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, अतिक्रमण विभागप्रमुख अतुल पाटील, अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सतीश ठाकरे, ज्ञानेश्वर कोळी, संजय पाटील, साजिद अली, नितीन भालेराव, भानुदास ठाकरे, कैलास सोनवणे, हिरामण बाविस्कर, दीपक कोळी, सलमान भिस्ती, इक्बाल शेख, नाना सोनवणे, नितीन भालेराव यांनी ही मोहीम राबविली.

गोलाणी मार्केटचा रस्ता मोकळा करा

गोलाणी मार्केटच्या चारही बाजूंनी दिवसभर अनेक वाहने रस्त्यावर उभी असतात. यातून नागरिकांना चालताही येत नाही. मारुती मंदिर ते जी. एस. ग्राऊंडचा रस्ता तर अर्ध्यापेक्षा अधिक वाहनांनी भरलेला असतो. सोबतच हॉकर्सच्या अनेक गाड्या रस्त्यावर लागलेल्या असतात. वाहतुकीची प्रचंड कोंडी दिवसभर होते. महापालिकेने या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी होत आहे.

Hawkers, an ongoing dispute among municipal employees. In the second and last photo, the staff impounding the cars.
Nashik Encroachment : कॉलेज, गंगापूर रोडवर सलग दुसऱ्या दिवशी मोहीम! 50 पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.