Jalgaon News : मजहब नही सिखाता..आपस मे बैर रखना! मुस्लिम तरुणाने वाचविला हिंदू बांधवाचा जीव; ईदच्या दिवशी रक्तदान

Jalgaon News : जळगाव येथील एका खासगी क्रिटिकल केयर हॉस्पिटल मध्ये भुसावळ येथील सुरेश पाटील यांना गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले अन...
Ayaz Mohsin while donating blood. Neighbor Nilesh Patil.
Ayaz Mohsin while donating blood. Neighbor Nilesh Patil.esakal
Updated on

अमळनेर : ....हिंदी है हम.... वतन है... हिंदुस्तान हमारा...या वाक्याचा प्रत्यय जळगावला एका घटनेच्या निमित्ताने आला. येथील एका खासगी क्रिटिकल केअर हॉस्पिटल गंभीर अवस्थेत असलेल्या हिंदू बांधवांसाठी रमजान ईदचा पवित्र दिवस असताना मानवतेला प्राधान्यक्रम देत मुस्लिम बांधवाने रक्तदानातून हिंदूंचा जीव वाचविला. (Jalgaon humanity Blood donation on ramadan eid marathi news)

जळगाव येथील एका खासगी क्रिटिकल केयर हॉस्पिटल मध्ये भुसावळ येथील सुरेश पाटील यांना गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. प्लेटलेटची संख्या खालावल्याने त्यांना गोळवलकर रक्तपेढी येथे पाठवण्यात आले. डॉ राहुल चौधरी यांनी ए पॉझिटिव्ह रक्तगट असलेले, प्लेटलेट ब्रँड एम्बेसेडर अयाज मोहसीन यांना संपर्क केला.

ते आप्तस्वकीयांसोबत रमजान ईदच्या कार्यक्रमात होते. गरजू रुग्णाला रक्ताची गरज आहे म्हणून त्यांनी मानवतेला प्राधान्य देत, ईदचा कार्यक्रम सोडून दहा मिनिटात गोळवलकर रक्तकेंद्र येथे तत्काळ उपस्थित झाले. त्यांना गोळवलकर ब्लड बँकेतील रक्त चाचणी अधिकारी नलिनी वैद्य आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. गरजू रुग्णाला योग्य वेळी प्लेटलेट लाभल्याने त्यांचे प्राण वाचविता आले. स्वार्थी जगात जिथे स्वकीय दगा देतात तेथे माणुसकी धर्म अजूनही जिवंत आहे याचे उदाहरण या घटनेतून दिसून आले. (latest marathi news)

Ayaz Mohsin while donating blood. Neighbor Nilesh Patil.
Nashik Teacher Protest : वेतन प्रणालीत नाव समाविष्टसाठी शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा

सुरेश पाटील यांचे पुत्र नीलेश पाटील यांनी आभार व्यक्त करताना म्हटले, की आमचे कुटुंब संकटात असताना अयाज मोहसीन यांची ईद असताना आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आल्याने वडिलांचे प्राण वाचू शकले. शिवाय गोळवलकर रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करत धीर दिला.

एकीकडे काही समाजकंटक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हिंदू मुस्लिमात दंगली घडून आणण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अशा या प्रतिकूल परिस्थितीत चांगल्या घटनांमुळे दूषित झालेले वातावरण शुद्ध व पोषक राहण्यास मदत होणार आहे.

"रमजान ईदचा पवित्र दिवस, मराठी हिंदू नववर्ष प्रारंभ होत असताना प्लेटलेट दान करण्याची संधी मिळाली हे मी माझे मोठे भाग्य समजतो. प्लेटलेट अंबेसेडर असल्याने जनजागृती करताना स्वतः ही प्लेटलेट दान करणे गरजेचे असल्यामुळे स्वतः प्लेटलेट दिल्या.राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम साधन म्हणजे रक्तदान प्लेटलेट दान होय."- अयाज मोहसीन, जळगाव

Ayaz Mohsin while donating blood. Neighbor Nilesh Patil.
Jalgaon News : सीमावर्ती भागातील चेक पोस्टवर लक्ष द्या! चोपडा येथील बैठकीत सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.