Jalgaon News : शहरात ‘आरटीओ’ व आदिवासी प्रकल्प कार्यालय होण्यासाठी शहरवासीयांनी बुधवारी (ता. २८) पुकारलेल्या बंदला शंभर टक्के पाठिंबा मिळाला. यानिमित्ताने श्रीराम मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, भडगाव येथील ‘आरटीओ’ कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे मोटार वाहन निरीक्षक सौरभ पाटील यांनी सांगितले. (Hundred percent response to Bhadgaon bandh)
भडगाव येथे २०१० पासून ‘आरटीओ’ कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, चाळीसगाव येथे अचानक शासनाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी दिली. ज्यामुळे भडगावात असंतोषाची लाट उसळली.
‘आम्ही भडगावकर’ या नावाखाली सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक एकत्र आले. मागील आठवड्यात ‘रास्ता रोको’ आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी ‘भडगाव बंद’चे आवाहन करण्यात आले होते. त्याला शहरातील व्यापारी बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला.
तहसील कार्यालयावर मोर्चा
सकाळी सव्वादहाच्या सुमारास श्रीराम मंदिरापासून मेन रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी परिवहन विभागाचे अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह विविध संघटना, मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. (latest marathi news)
मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर
मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक सौरभ पाटील, सुनील गुरव, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक उमेश सोलापुरे व महेश सहाणे उपस्थित होते.
मोर्चेकऱ्यांतर्फे ‘आरटीओ’कडे आतापर्यंत भडगाव येथील कार्यालयासंदर्भातील सर्व कागदपत्रांची मागणी केली असता, काही कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे जोपर्यंत सर्व कागदपत्रे मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली.
अखेर तहसीलदार बनसोडे यांच्या दालनात शिष्टमंडळ व ‘आरटीओ’च्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. ज्यात तहसीलदारांनी मध्यस्थी करीत काही कागदपत्रे आंदोलनकर्त्यांना दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.