Jalgaon Rain Update: धरणांमधील जलसाठ्यात सुधारणा! पाऊस झाल्याचा परिणाम; काही भागांतील पाणीटंचाई दूर, शेतकऱ्यांत समाधान

Jalgaon News : नाशिक जिल्ह्यासह खानदेशलाही उपयुक्त ठरणाऱ्या गिरणा धरणात २.९८० टीएमसी इतका पाणीसाठा असून, तो १६.१३ टक्के इतका आहे
Water release from Aner Dam on Saturday.
Water release from Aner Dam on Saturday.esakal
Updated on

गणपूर(ता. चोपडा) : गेल्या काही दिवसांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही भागांतील पाणीटंचाई दूर होण्यास मदतही होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. (Improvement in water storage in dams)

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात ३,६९५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, तो ६५.६३ टक्के आहे, तर दारणा धरणात ६,११३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, तो ८५.५१ टक्के इतका झाला आहे. कडवा धरणात १,४५२ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा असून, तो ८६.०२ टक्के इतका आहे.

पालखेड धरणात ३५३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला असून, तो ५४.०६ टक्के इतका आहे. मुकणे धरणात २,७८७ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला असून, तो ३८.५० टक्के इतका आहे. करंजवण धरणात १,२२६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, तो २२.८३ टक्के इतका आहे.

नाशिक जिल्ह्यासह खानदेशलाही उपयुक्त ठरणाऱ्या गिरणा धरणात २.९८० टीएमसी इतका पाणीसाठा असून, तो १६.१३ टक्के इतका आहे. हतनूर धरणात २.८६० टीएमसी पाणीसाठा झाला असून, तो ३१.७४ टक्के इतका आहे. वाघुर धरणात ५.६५० टीएमसी पाणीसाठा झाला असून, तो ६४.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गुळ धरणात ०.५२० टीएमसी इतका पाणीसाठा असून, तो ६४.२३ टक्के इतका आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यांच्या सीमेवरील अनेक धरणात ००.६०० टीएमसी इतका पाणीसाठा असून, तो ३४.५० टक्के इतका आहे. या धरणातील पाणीसाठा गेल्या आठवड्यात वाढ झाल्याने ५८ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. (latest marathi news)

Water release from Aner Dam on Saturday.
Dhule Monsoon Rain Update : जिल्ह्यातील प्रकल्पांत 40 टक्के साठा! बहुतांश गावांची पाणीटंचाई दूर

मात्र, धरणातील पाणीसाठ्यात होणारी आवक लक्षात घेता उर्वरित पाणी काढून नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पुढील काळात धरणाचा पाणीसाठा पूर्ण होण्यास बराच कालावधी आहे. या धरणाचे दरवाजे १५ऑगस्टपर्यंत उघडे ठेवून येणारे पाणी बाहेर काढले जाते. प्रकाशामध्ये ०१.०१० टीएमसी म्हणजे ४६.१४ टक्के पाणीसाठा आहे.

महाराष्ट्रातून वाहून जाणारे तापी नदीचे पाणी ज्या धरणात पोहोचते, त्या गुजरातमधील उकई धरणात १४३.०२० टीएमसी पाणीसाठा झाला असून, तो ६०.१८ टक्के आहे. सध्यास्थितीत गिरणा धरण परिसरात २३७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हतनूर परिसरात ४५३ मिलिमीटर, अनेर धरण परिसरात ४१० मिलिमीटर, तर वाघूर धरण परिसरात ५७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पिकांना होणार फायदा!

गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी कायम ठेवल्याने पिकांची वाढ होऊन फायदाच होणार आहे. सोबतच धरणांमधील जलसाठ्यात वाढ होणार असल्याने आगामी हंगामातही त्याचा पिकांना फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Water release from Aner Dam on Saturday.
Nashik Monsoon Rain Update : गंगापूर धरण 66 टक्के भरले, श्रावणात पाण्याचा विसर्ग! 78 टक्के भरल्यानंतर मराठवाड्यासाठी पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.