Jalgaon Crime : अमळनेरला एकावर लोखंडी रॉडने मारून जातीवाचक शिवीगाळ

Jalgaon Crime : फरशी रोडवरील नदीकाठावर शिवीगाळ करू नका, असे सांगायला गेलेल्या व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली.
Jalgaon Crime
Jalgaon Crimesakal
Updated on

अमळनेर : फरशी रोडवरील नदीकाठावर शिवीगाळ करू नका, असे सांगायला गेलेल्या व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली. याबाबत येथील पोलिसांत सात जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. संतोष श्रावण बिऱ्हाडे (वय ४०, रा. फरशी रोड) २८ सप्टेंबरला दुपारी तीनला बाजारात जाण्यासाठी निघाले. गल्लीतील अब्दुल रहीम बेलदार ऊर्फ दिलावर, मुन्ना बिलास खाटीक, तोसिफ ताहेर बेलदार, सलमान बाबा फकीर ऊर्फ फुट्या, मुज्या बेलदार (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन जण आपसात शिवीगाळ करीत होते. (beaten with iron rod and abuse to person )

‘घरात महिला आहेत. तुम्ही माझ्या घरासमोर शिवीगाळ करू नका’ असे संतोष बिऱ्हाडे यांनी संशयितांना सांगितले. त्याचा राग आला आणि दिलावर याने शर्टाची कॉलर पकडून संतोष यांच्या कानशिलेखाली लगावली. संतोष यांची आई हिराबाई संतोष यांना सोडविण्यासाठी आल्या असता, सलमानने हिराबाईचे दोन्ही हात पकडले व दिलावरने त्यांना मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच ‘यांना इथे राहू देऊ नका, घर जाळून टाका’ अशी धमकी दिली.

Jalgaon Crime
Jalgaon Crime News : मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप! विखरण येथील महिलेची पुराव्याअभावी सुटका

संतोष हे आईला सोडविण्यासाठी गेले असता, दिलावरने रिक्षातून लोखंडी रॉड काढून संतोष यांच्या तोंडावर मारल्याने त्यांचे सहा दात पडले. तोंडातून रक्तस्राव होऊ लागला. जबड्याला मार लागून ते चक्कर येऊन खाली पडले. संतोष यांना ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यांना काहीच बोलता येत नव्हते. तेथून डॉक्टरांनी त्याला धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचार घेऊन परत आल्यावर अमळनेर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

Jalgaon Crime
Jalgaon Crime News : अनाधिकृत गॅस पंप सुरूच! शिरसोलीतील छाप्यात 73 सिलिंडरसह संशयिताला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.