SAKAL Exclusive : जळगाव जिल्ह्यात कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, उत्पादनवाढीसाठी होणारे प्रयोग त्यामानाने तोकडेच आहेत. शेतकरी आता कपाशीचे पीक परवडत नसल्याचे म्हणू लागले आहेत. कपाशीच्या पिकावर अमावस्येच्या रात्रीचा विचार करता गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी व कृषी विभागाने याकडे गांभीर्याने पाहत उपाययोजना करण्याची आत्तापासूनच गरज आहे. जिल्ह्यातील काही भागांत बोंडअळीचा अल्पप्रादुर्भाव यापूर्वीच दिसून आला आहे. (In district bollworm has increased on cotton crop )