Jalgaon News : नशिराबादला कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची भक्कम साथ यामुळेच सर्वसमावेशक विकास होत आहे. नगरपालिका निवडणूकीपूर्वीच नशिराबादचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
नशिराबाद बस स्थानक चौकात विविध विकास कामांच्या लोकार्पण, भूमिपूजन, भांडे संच वाटप प्रसंगी ते बोलत होते. (Jalgaon Inauguration of various development works at Nasirabad by Guardian Minister Patil)
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, सरिता कोल्हे -माळी, मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, शहर प्रमुख विकास धनगर, युवासेनेचे चेतन बऱ्हाटे , रामेश्वर मोताळे, निळकंठ रोटे, प्रवीण पाटील, सरपंच, सदस्य, सोसायटी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, की ५७ कोटीची पाणी योजना मंजूर झाली असून पाण्याचे आरक्षणावरील शिक्कामोर्तब झाला आहे. नशिराबादला भरघोस विकास निधी दिल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांचा कार्यकर्ते विविध संघटनांतर्फे आतषबाजी औक्षण करून, शाल श्रीफळ व बुके देउन सत्कार केला. पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या विकास कामांचा पाढाच माजी सरपंच विकास पाटील यांनी वाचला.
दिडशे महिलांना भांडे
नशिराबाद येथे निवडणुकीपूर्वीच विशेष रस्ता योजनेंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, गटार बांधकाम, पेव्हींग ब्लॉक बसविणे, बगीचा तयार करणे आदी पायाभूत सुविधांच्या १६ कोटींच्या तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील ४ कोटींच्या कामांचे भूमीपूजन झाले. यावेळी १५० महिलांना प्रत्येकी १० हजाराचा भांड्यांचा सेट पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
प्रास्ताविकात मुख्याधिकारी सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक राजेंद्र पाचपांडे यांनी केले आभार संतोष रगडे यांनी मानले. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.