Jalgaon News: चोपडा तालुक्यात तूर पिकाच्या लागवडीत वाढ! 2 हजार एकर क्षेत्र; कमी खर्चात अधिक उत्पन्न येण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

Agriculture News : खरे तर कपाशीतील एकेकाळचे दुय्यम पीक तूर होते, ते क्षेत्र आता वाढू लागले आहे.
Turi crop cultivated in Shiwar
Turi crop cultivated in Shiwar esakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : चोपडा तालुक्यात गेल्या वर्षापासून तूर पिकाच्या लागवड क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी तालुक्यात सुमारे दोन हजार एकरांवर तुरीची लागवड होत असल्याचे चित्र सध्या आहे. खरे तर कपाशीतील एकेकाळचे दुय्यम पीक तूर होते, ते क्षेत्र आता वाढू लागले आहे. (Jalgaon Increase in Cultivation of Tur Crop in Chopda Taluka)

तालुक्यात कपाशीचे लागवड क्षेत्र मोठे आहे. मात्र, गेल्या वर्षी बोंडअळीचा उत्पादनावर परिणाम झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना कपाशीचे पीक परवडले नाही. त्याला पर्याय म्हणून यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशीचे क्षेत्र कमी करीत त्याजागी तूर व मका लागवडीचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, जाहीर झालेल्या खरीप पिकांच्या हमीभाव दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. आधारभूत किमतीत तुरीने बाजी मारत कापूसपेक्षा अधिक हमीभाव म्हणून जाहीर झाला आहे. कापूस हमीभाव सात हजार १२१ रुपये तर, तुरीचा हमीभाव सात हजार ५५० रुपये झाला आहे.

दरम्यान, यावर्षी तुरीचे भाव वाढून सहा हजारपासून विक्री होणारी तुर शेवटी बारा हजार रुपयांपर्यंत बाजारात विकली गेली. त्यामुळे तूर लागवड करणारऱ्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसा कमी मेहनतीत मिळू लागल्याने खानदेशात तिची लागवड वाढत असल्याचे दिसून आले आहे.

(latest marathi news)

Turi crop cultivated in Shiwar
Bidri Sugar Factory : 'बिद्री' कारखाना कामगार पतसंस्थेत सत्तांतर; महालक्ष्मी विकास आघाडीच्‍या सर्व जागांवर विजय, दोन जागा बिनविरोध

काही वर्षांपासून नंदुरबार, तळोदा परिसरात तुरीचे पीक घेतले जाते. मात्र, ते आता सर्वत्र खानदेशातच वाढताना दिसू लागले आहे. नवीन हायब्रीड बियाणे बाजारात येऊ लागल्याने व त्याची थ्रेशरने काढणी होऊ लागल्याने हे पीक काढण्यासाठी सोपे जाते. म्हणून शेतकऱ्यांनी हळूहळू का होईना तूर लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे यातून दिसून आहे.

चोपडा तालुक्यात गेल्यावर्षी सुमारे अकराशे एकर क्षेत्रावर तुरीचे लागवड क्षेत्र होते. मात्र, यावर्षी कृषी विभागाच्या प्रस्तावित लागवड क्षेत्रात ५७६ हेक्टर म्हणजे जवळपास एक हजार चारशे एकर लागवड होईल, असा अंदाज गृहित धरला आहे. कमी खर्चातील बियाणे व दोन फवारणीत हे पीक येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता या पिकाला पसंती देणे सुरू केल्याचे तालुक्यातील लागवडीवरून दिसून आले आहे.

"मी गेल्यावर्षी तूर पिकाची लागवड केली होती. कमी खर्चात व कमी फवारणीत हे पीक येत असल्याने कपाशी एवढा खर्च त्यासाठी होत नाही. त्यामुळे यावर्षी सहा बिघे क्षेत्रावर तूर लागवड केली असून, त्याकडे अधिक लक्ष पुरविणार आहे."

- सर्जेराव पाटील, शेतकरी, गणपूर (ता. चोपडा)

Turi crop cultivated in Shiwar
Jalgaon News : महामार्गालगतचा सर्व्हिस रोड वाहनधारकांसाठी धोकादायक! संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.