Jalgaon News : सततच्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. दूषित पाणी व हवा यामुळे अमळनेरचे आरोग्य बिघडले आहे. अनेक नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, हगवण यांसारखे आजार होऊ लागल्याने दवाखान्यात गर्दी वाढली आहे. गेले सात-आठ दिवस सतत पाऊस पडला. अमळनेर तालुक्यात आतापर्यंत सव्वामहिन्यात ३७२ मिमी पाऊस म्हणजे वार्षिक पावसाच्या ५५ टक्के पाऊस पडून गेला आहे. (Increase in number of patients in Amalner city hospitals are full )
शहरात अनेक रिकाम्या प्लॉट, खुले भूखंडात पाण्याचे डबके साचल्याने डास, मच्छर, माशा, कीटकांची पैदास वाढली आहे. शिवाय तापी नदीलाही हतनूर धरणाचे पाणी सोडले असल्याने व काही ठिकाणी जलवाहिनी लिकेजमुळे गढूळ पाणी येते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
''ग्रामीण रुग्णालयात ताप, सर्दी, खोकला असे साधारणतः २०० रुग्ण येत आहेत. पावसाळ्यात वातावरण बदलामुळे आरोग्यावर परिणाम होतातच.''-डॉ. प्रकाश ताडे, ग्रामीण रुग्णालय, अमळनेर. (latest marathi news)
''दूषित पाणी, हवामान किंवा व्हायरल विषाणूमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. मात्र, दोन दिवसांत बरेदेखील होत आहेत. पावसाच्या वातावरणात नागरिकांनी खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.''- डॉ. नीलेश पाटील, अमळनेर.
''रस्त्यावर व नगरपालिकेच्या खुल्या भूखंडात कीटकनाशक तणनाशक फवारणी व स्वच्छता सुरू आहे. मात्र, नागरिकांच्या खासगी प्लॉटमधील घाणीची, कचऱ्याची साफसफाई झाली पाहिजे.''- तुषार नेरकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, अमळनेर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.