Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यात मतदार संख्येत 18 हजारांची वाढ; आता 35 लाखांवर मतदार

Jalgaon Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने २० हजार कर्मचाऱ्यांची निवडणूक कामी नियुक्ती केली आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने २० हजार कर्मचाऱ्यांची निवडणूक कामी नियुक्ती केली आहे. ३५ हजार कर्मचाऱ्यांची नावे मतदान प्रक्रियेसाठी घेण्यात आली आहे. २३ जानेवारीस अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर २९ फेब्रुवारीपर्यंत एकूण १७ हजार ९५५ नवीन मतदारांनी नाव नोंदणी केली आहे.(Jalgaon increase in number of voters in district by 18 thousand)

जळगाव व रावेर लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच उमेदवारी अर्ज भरावा लागणार असून जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा अशी दोन कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात येत आहेत. जानेवारी २०२४ मध्ये ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार होते. आता ३५ लाख ९ हजार ५३ झाले आहेत. जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणुकीत ३ हजार ५५९ मतदान केंद्र होती.

या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३ हजार ५६४ झाली आहे. जिल्ह्यात शहरी भागात १ हजार ६९ व ग्रामीण भागात २ हजार ४९५ मतदान केंद्र आहेत‌. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात ४३०, ग्रामीण भागात १ हजार ६०८ असे एकूण २ हजार ३८ ठिकाणे आहेत.१४ ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र सुरू करण्यात येतील. कारण त्याठिकाणी मतदारांची संख्या १ हजार ५०० च्या वर आहे. १७८२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचे नियोजन आहे.

दुर्गम भागातील १६ मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क नाही,अशी ठिकाणी ड्रोन व वॉकीटॉकीने मतदानाची आकडेवारी घेण्यात येईल. जिल्ह्याची लोकसंख्या ४७,४०,८८२ इतकी आहे. यात ३५ लाख ९ हजार ५३ मतदार संख्या आहे. मतदारांमध्ये १८ लाख २० हजार १४२ पुरुष तर १६ ८८ हजार ७८१ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी १३५ मतदार आहेत. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग १९ हजार २११ मतदार आहेत. ८० वर्षांवरील वयोमान असलेले १ लाख ३ हजार १२९ मतदार आहेत. (latest marathi news )

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या कामातून आजारी शिक्षकांना वगळण्याची मागणी

दोन महिन्यांत, पुरुषांपेक्षा ७२ टक्क्यांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. लिंग गुणोत्तर दर १००० पुरुषांमागे ९२७ महिला असे आहे. यात सुधारणा झाली आहे. २७ ऑक्टोबर २०२३ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या १६ हजार २२९ वरून ३८ हजार २९६ झाली आहे. २०२२ पासून जिल्ह्यात एकूण ६३ हजार ७११ मतदारांची वाढ झाली आहे. २ लाख ४३ हजार १५ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत, तर ३ लाख ६ हजार ७२६ मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे.

आकडे बोलतात..

* जिल्ह्यात मतदान केंद्र -३ हजार ५६४

* वेबकास्टिंग होणारे मतदान केंद्र- १ हजार ७८२

* जिल्ह्यात बॅलेट युनिट -९ हजार ३३९

* कंट्रोल युनिट-५ हजार ४५०

* व्हीव्हीपीएटी मशिन- ५ हजार ७३३

"जिल्हा प्रशासनाने जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापासून मतदानापर्यंतची कार्यपध्दती तयार केली आहे. त्यानूसार २० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जळगाव व रावेर लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष सूरू केले जातील."- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.

Lok Sabha Election 2024
Jalgaon News : हुकूमशहा मोदीविरोधात ताकदीने सामना करा : उध्दव ठाकरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.