Jalgaon News : घात, अपघात अन्यायासाठी डायल 112 वर वाढल्या तक्रारी; 11 हजारांवर नागरिकांनी मिळविली मदत

Jalgaon : जानेवारी ते जून या सहा महिन्यांत १० हजार ७९३ कॉल आले, तर जुलै महिन्यात हजारावर लोकांनी संपर्क साधून मदत मिळविली आहे.
A lady police officer taking a call on Dial 112.
A lady police officer taking a call on Dial 112.esakal
Updated on

Jalgaon News : जिल्‍हा अपघाती मृत्यूमध्ये अव्वलस्थानी आहे. अपघातस्थळावर मदतीसाठी नेमके कोणाला फोन करू? छेड काढली जात असेल, तर कुणाला सांगू? स्वत:वर बाका प्रसंग आल्यावर कोण मदत करेल? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे डायल-११२. जिल्‍हा पोलिस दलाच्या या संकटकालीन संपर्कावर तक्रारी आणि माहिती देण्याचे प्रमाण वाढले असून, जानेवारी ते जून या सहा महिन्यांत १० हजार ७९३ कॉल आले, तर जुलै महिन्यात हजारावर लोकांनी संपर्क साधून मदत मिळविली आहे. ( Increased complaints on dial 112 for abuse Accident and Injustice 11 thousand citizens get help)

शहर, उपनगर असो, की ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास ११२ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यास तत्काळ सूत्रे हलवून मदत पोचविली जाते. कोणाचा कॉल आला? तो व्यक्ती कुठे आहे? त्याला काय मदत हवी आहे, याचा सर्व डाटाबेस तयार असल्याने प्रत्येकला मदत मिळणारच याची शाश्वती असते विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने अवघ्या काही सेकंदात फोन कोठून आला, हे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या डिजिटल नियंत्रण कक्षात कळते. त्यानंतर पोलिस, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना कॉलची माहिती दिली जाते.

हजर होऊन प्रत्येक कॉल पूर्ण

डायल ११२ वर कॉल आल्यानंतर तत्काळ पोलिस संबंधित ठिकाणी पोचतात. त्यात बऱ्याच वेळा अपघाताचे ठिकाण असते. कधी मारामारी झाली, वाद घालत होते, आता ते निघून गेले, असेही प्रकार समजतात. जेवढे कॉल आले, त्या प्रत्येक ठिकाणी पोलिस पोहोचतात. आलेल्या एकूण कॉलपैकी ७ हजार २१५ कॉल पूर्ण करून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. (latest marathi news)

A lady police officer taking a call on Dial 112.
Jalgaon News : जामनेरच्या 8 खेळाडूंचा स्केटिंग स्पर्धेत विश्वविक्रम; ‘गीनिज बुक’मध्ये नोंद

अपघात, हाणामारी, महिलांच्या तक्रारी अधिक

डायल ११२ वर सर्वाधिक तक्रारी महिलांकडून करण्यात येतात. त्याचबरोबर अपघात, घरगुती छळ, छेड, पतीकडून मारहाण, अशा तक्रारी येतात. याशिवाय मारहाण, मारामारी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी येतात.

विशेष प्रशिक्षित लोकांचे नेटवर्क

फोन आल्यावर कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा, कोणते पोलिस वाहन तिथे निघाले व स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची, याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. २४ तास कर्मचारी कार्यरत असतात. नियंत्रण कक्षासह संबंधित पोलिस ठाण्याचे वाहनही या यंत्रणेशी जीपीएसद्वारे कनेक्ट आहे.

A lady police officer taking a call on Dial 112.
Jalgaon News : एरंडोलच्या वसुंधरा पार्ककडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; सर्वत्र अस्वच्छता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.