Jalgaon Crime Update: कायद्याच्या राज्यात सुव्यवस्थेचं आव्हान! जळगाव जिल्ह्यात पोलीस यंत्रणा जरब ठेवण्यात अपयशी

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील सातत्यपूर्ण घडणाऱ्या घटना लक्षात घेता या कायद्याच्या राज्यातच पोलिस यंत्रणेसमोर सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभं ठाकल्याचे चित्र दिसतेय..
Police
Policeesakal
Updated on

आपण हे कायद्याचं राज्य आहे असं म्हणतो.. प्रत्यक्षात अनेकदा या कायद्याच्या राज्यात कायदा, नियम धाब्यावर बसवून सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम काही समाजकंटकांकडून केलं जातं.. ज्यांच्यावर जबाबदारी असते ती यंत्रणा मात्र अशा प्रवृत्तींवर जरब ठेवण्यात अपयशी ठरत असतात.. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील सातत्यपूर्ण घडणाऱ्या घटना लक्षात घेता या कायद्याच्या राज्यातच पोलिस (police) यंत्रणेसमोर सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभं ठाकल्याचे चित्र दिसतेय.. (Jalgaon increased Crime marathi news)

गेल्या काही महिन्यांत जळगाव जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत. अलिकडच्या काळात या घटनांमध्ये वाढ झाली. वाळू माफियांची मुजोरी असो, शस्त्रधारी गुंडांची दहशत असो, पूर्ववैमनस्यातून परस्परांचा ‘काटा’ काढण्याची प्रवृत्ती असो.. की, महामार्गावर व्यापाऱ्याची गाडी अडवून त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवून कोट्यवधींच्या लुटीचा थरार.. अशा सर्वच घटना जळगाव जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत.

जळगाव जिल्हा जसा राजकीय घडामोडींच्या बाबतीत संवेदनशील समजला जातो, तसा तो कायदा- सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. मुंबई, पुणे, नागपूरनंतर छत्रपती संभाजीनगर व नाशिकच्या खालोखाल जळगाव जिल्ह्याची संवेदनशीलता मोजली जाते. स्वाभाविकत: जिल्ह्यात घडणाऱ्या घडामोडी थेट राज्याच्या राजकीय व्यवस्था व प्रशासकीय यंत्रणेवरही परिणाम करीत असतात.

गेल्या काही महिन्यांत व अलिकडच्या दिवसांत जिल्ह्यात अशा काही घटना घडल्या आहेत की, त्यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन त्याचे रिपोर्टिंग थेट गृहमंत्र्यांपर्यंत झालेय. जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी कमालीची वाढली आहे.

तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या थेट घरी जाऊन त्यांना धमकावण्याच्या घटनेनंतर आठवडाभरापूर्वीच वाळूचे डंपर अडविणाऱ्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर थेट हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी करण्याइतपत वाळू माफियांची मजल गेली. जळगाव शहरात भर दिवसा टोळ्यांच्या पूर्ववैमनस्यातून एकमेकांवर पिस्तूल रोखल्याचा प्रकार घडला.. (Latest Marathi News)

Police
Nashik Crime News : ‘हॉटेल द फॉरेस्ट’वर पोलिसांची धाड; हुक्का पार्लर होते सुरू

पाठोपाठ चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याची घटनाही समोर आली. उल्हासनगर, मुंबईतील गोळीबाराच्या घटना ताज्या असताना जळगाव जिल्ह्यातही सर्रास पिस्तूल निघत असल्याचे प्रकार थेट पोलिसांनाच आव्हान देणारे ठरत आहेत.

वारंवार घडणाऱ्या या घटना खरेतर, सर्वसामान्य नागरिकांशी थेट संबंधित नसल्या तरी त्यामुळे जनमानसात कमालीची दहशत त्यामुळे निर्माण झाली आहे. पोलिस अधीक्षकांची बदली होऊन डॉ. रेड्डी यांनी नुकताच पदभार स्वीकारायला आठवडाही झाला नाही, तोच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर मुसळी फाट्याजवळ कापूस व्यापाऱ्याची गाडी अगदी ‘सिनेस्टाईल’ अडवत त्याच्यावर हल्ला होता..

दरोडेखोर त्याच्याकडील दीड कोटींची रक्कम चोरुन फरार होतात.. ही घटनाही थरकाप उडविणारी आहे. फैजपूर येथून स्कॉर्पिओची चोरी करुन, ‘परफेक्ट टीप’ मिळवत हा गुन्हा घडलांय. त्यातून इतरही अनेक गंभीर पैलू समोर येण्याची दाट शक्यता आहे.

वस्तुत: मुसळी फाटा व त्यापासून धरणगावपर्यंतचा रस्ता हा कापूस व्यापाऱ्यांसाठी नेहमीच ‘डेंजर झोन’ राहिलेला आहे. याआधीही या रस्त्यावर, परिसरात अशा घटना घडल्याचा इतिहास आहे. पण, त्यातून धडा घ्यायला यंत्रणा तयार नाही. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचा बराचसा कापूस भाव नसल्याने पडून आहे.

अशात जीनिंगची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही मोठे व्यवहार होऊन व्यापाऱ्यांच्या हाती मोठी रक्कम लागते. या भागाची एकूणच व्यावसायिक स्थिती माहिती असलेल्या दरोडेखोरांनी त्यावर पाळत ठेवून हा ‘गेम’ केला. या मार्गावर गस्तीची अत्यावश्‍यकता असताना पोलिस यंत्रणा नेहमीच सुस्त असतात, त्याचाही हा प्रत्यय म्हणावा लागेल.

त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होणेही स्वाभाविक आहे.. राज्य कायद्याचं आहे, हे केवळ बोलण्यापुरते ठीक.. पण, अशा घटनांमधून सुव्यवस्था राखण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभे आहे, हे निश्‍चित.

Police
Nashik Crime News : सोशल मीडियावर अश्लिल चित्रफिती; सायबर पोलिसात गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.