गणपूर (ता. चोपडा) : देशात दरवर्षी सुमारे १२५ ते १३० लाख हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केली जाते आणि ढोबळ मानाने ३१० ते ३३५ लाख गाठी कापसाचे उत्पादन दरवर्षी येते. असा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र यावर्षी इतर पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली असून, कपाशीचे क्षेत्र सर्वच राज्यांमध्ये कमी झाल्याचे दिसून आले आहे.
खानदेशातही यावर्षी मका पिकाचे लागवड क्षेत्र वाढल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाचे पेरणी क्षेत्र देशांतर्गत सुमारे १४.१२९ लाख हेक्टरने घटले असून, ऑगस्टच्या अंतिम आठवड्यापर्यंत ही घट ११.०८ लाख हेक्टर एवढी होती. (Indications of domestic cotton production decline)