Jalgaon News : ‘रफूचक्कर’ झालेल्यांना मिळाले ‘मोबाईल’चे बळ! घरातून पळून गेलेल्या युवक-युवतींच्या जबाबातून मिळाली माहिती

Latest Jalgaon News : येथील पोलिसांनी अशाच पद्धतीने घरून पळून जाऊन परस्पर लग्न करणाऱ्या काही युवक, युवतींच्या घटनांचा अभ्यास केला असता, त्यात तरुण- तरुणींना पळून जाण्यासाठी त्यांचा मोबाईलच प्रभावी माध्यम ठरल्याचे दिसून आले आहे.
Couple Ran away
Couple Ran awayesakal
Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : घरातून पळून जाऊन विवाह करणे तसेच परस्परांसोबत बाहेरगावी राहण्याचे प्रमाण अलिकडे युवक-युवतींमध्ये वाढले आहे. यात मोबाईलचा सिंहाचा वाटा असल्याचे दिसून आले आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट मोबाईल आला असला तरी त्यातून मनाने स्मार्ट होण्याऐवजी युवक-युवतींकडून त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होताना दिसत आहे.

येथील पोलिसांनी अशाच पद्धतीने घरून पळून जाऊन परस्पर लग्न करणाऱ्या काही युवक, युवतींच्या घटनांचा अभ्यास केला असता, त्यात तरुण- तरुणींना पळून जाण्यासाठी त्यांचा मोबाईलच प्रभावी माध्यम ठरल्याचे दिसून आले आहे. (young men women who ran away from home mobile helped them)

पालकांनो, सावध व्हा !

आपला मुलगा किंवा मुलगी जास्त वेळ मोबाईलवर चिटकून राहत असेल तर पालकांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मुले मोबाईल काही क्षणासाठीही सोडत नसतील तर ती धोक्याची घंटा समजावी. एखादा विशिष्ट कॉल आल्यावर मुले कावरीबावरी होत असतील किंवा आलेला फोन कट करत असतील तर त्याबाबतचे कारण मुलांना विश्‍वासात घेऊन पालक म्हणून जाणून घेतले पाहिजे. आपल्या मुलांशी सुसंवाद वाढवून ते मोबाईलचा अतिवापर करणार नाही, याची काळजी स्वतःपासून घ्यावी.

चॅटिंगमुळे होतोय घात

अलिकडे युवक- युवती ‘टेक्नोसेव्ही’ झाले आहेत.`त्यामुळे आई-वडिलांपेक्षा युवक युवतींना त्याबाबतची जाण अधिक आली आहे. पर्यायाने व्हॉट्सअपला पासवर्ड लावणे, व्हाट्सअप ऐवजी इन्स्ट्राग्रामचा वापर करणे, फेसबुकच्या इनबॉक्सचा वापर करण्याचे प्रकार युवक- युवतींकडून होतात. पर्यायाने आई-वडिलही हतबल होतात.

‘दुनिया मेरी मुठ्ठी मेंं’ म्हणत आपल्या घरासह कुटुंबच हातातून सुटून जात आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलामुलींच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेतली तर भविष्यात घडणाऱ्या अनुचित घटनांना निश्‍चितपणे आळा बसू शकतो. (latest marathi news)

Couple Ran away
Vidhansabha Diary: Akola Murtijapur मतदारसंघात कोण बाजी मारणार? | Maharashtra Politics

मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात...

"मोबाईलमुळे एकमेकांचे संभाषण वाढले आहे. यात घरातील वडिलधाऱ्यांपासूनच मुले सहज शिकत असतात. एकमेकांशी संपर्क करणे, त्यांच्यांशी बोलत राहणे, त्यातून भावनिक गुंतवणूक वाढवणे या गोष्टी मुलांमध्ये जाणत्या वयातच आल्या पाहिजेत. मोबाईलमुळे सहजगत्या ज्यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेवले जात नाही. त्यावेळी नको ते मटेरियल त्यांच्याजवळ पोहचते. परिणामी, त्यातून त्यांची उत्सुकता वाढते. ‘सोशल मिडिया’वर येणारे मेसेजसह ‘रिल्स’ व ‘मुव्हींं’मुळे दाखवल्या जाणाऱ्या प्रेमाविषयीच्या भडक कल्पना मुला-मुलींमध्ये घर करतात आणि त्यातून एकमेकांविषयीचे आकर्षण वाढून नको त्या गोष्टी घडतात. म्हणूनच घराघरांत आई- वडिलांचा आपल्या मुलांशी सुसंवाद असला पाहिजे. मुळात आई-वडिलांचा मोबाईल वापरावर कंट्रोलच राहिलेला नाही. त्यांच्यामुळेच मुले- मुली भरकटल्यासारखे झाले आहेत."

- डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, जळगाव

Couple Ran away
Jalgaon News : आशा, गटप्रवर्तकांना दहा लाखांचे सुरक्षाकवच! चोपडा तालुक्यातील 224 आशा, 14 गटप्रवर्तकांना होणार लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.