Jalgaon Summer Heat : तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली; काळजी घेण्याचे वैद्यकीय विभागाचे आवाहन

Jalgaon News : एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणू लागला आहे. त्यामुळे सकाळी नऊपासूनच उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत.
Summer Heat
Summer Heatesakal
Updated on

पारोळा : एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणू लागला आहे. त्यामुळे सकाळी नऊपासूनच उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला. (Jalgaon Intensity of summer heat increased in Taluka Medical department call to care)

ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे उन्हाची तीव्रता कमी वाटू लागली होती. मात्र रविवार (ता. १४)पासून उन्हाची तीव्रता वाढली असून, सूर्य आग ओकू लागल्याचे जाणवू लागले आहे. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी उष्माघात होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन

केले आहे. उन्हाची तीव्रता वाढली असल्याने दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात फिरणे बंद करावे, उच्च प्राथमिकता आहार आणि शिळे अन्न खाऊ नये, पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नये, मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेट सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नये त्यामुळे डीहायड्रेशन होते. (latest marathi news)

Summer Heat
Jalgaon News : राष्ट्रवादी‘चे प्रा.मनोज पाटील समर्थकांसह शिंदे गटात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

उष्माघात वाचविण्यासाठी हे करा

- उन्हात डोक्यावर छत्री वा टोपीचा वापर करावा

- डोळे, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करावा

- तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या

- अशक्तपणा, कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

- प्रवास करताना सोबत पाणी घ्या, तसेच ओआरएस, घरची लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबूपाणी, ताक इत्यादी घ्यावे

- आपले घर थंड ठेवावे, पडदे, झडपा, सनशेड बसवावीत आणि रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात

- सौम्य रंगाचे सैल आणि कॉटनचे कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल यांचा वापर करावा,

- जनावरांना सावलीत ठेवावे आणि पुरेसे पाणी द्यावे,

- फॅनचा वापर करावा, थंड पाण्याने अंघोळ करावी

या सूचनांचे पालन केले तर उष्माघातापासून बचाव होऊ शकतो.

Summer Heat
Jalgaon News : कर्जबाजारी शेतकऱ्याने चोरवड येथे उचलले टोकाचे पाऊल

"लहान मुलांना उन्हाचा त्रास होणार नाही, याबाबत कुटुंबाने काळजी घ्यावी. बाहेरच्या वस्तू खाणे टाळावे, तसेच दूषित पाणी असल्यास पाणी उकळून प्यावे. शक्यतो मुलांना बाहेर फिरवू नये. योग्य काळजी घेतली तर उन्हापासून बचाव होऊ शकतो." - डॉ. सुरेश पाटील, श्रद्धा हॉस्पिटल, बालरोगतज्ज्ञ, पारोळा

Summer Heat
Jalgaon Fire Accident : एमआयडीसीत केमिकल कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू; जळगावातील दुर्घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.