International Noise Awareness Day 2024: कर्कश्‍श आवाजाने चिडचिड, डोकेदुखीचे रुग्ण वाढले! हेडफोनचा अतिवापरही कारणीभूत

Jalgaon News : कर्कश आवाजामुळे मानवाची चिडचिड, डोकेदुखीसह आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहे.
International Noise Awareness Day 2024
International Noise Awareness Day 2024esakal
Updated on

International Noise Awareness Day 2024 : गोंगाट, कर्कश आवाज, अनावश्यक किंवा अप्रिय आवाज कोणालाही आवडत नाही. क्षमतेपेक्षा अधिक डेसिबलचा आवाज वारंवार कानावर पडत असेल, तर मानवावरच नाही, तर प्राण्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो. कर्कश आवाजामुळे मानवाची चिडचिड, डोकेदुखीसह आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहे. हा प्रकार थांबला नाही, नियंत्रणात आणला नाही, तर प्रत्येक व्यक्तीत कर्णदोष आढळून येतील. (jalgaon International Noise Awareness Day 2024 marathi health news)

आवाजाची तीव्रता आणि सातत्य कमीत कमी अधिक प्रमाणात असतील, तर गोंगाट कटकट होतो. आवाजाचे रूपांतर गोंगाटात होते. तेव्हा त्याचा मानवाच्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या श्वसन संस्थेवर, चेतासंस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो. एप्रिलच्या शेवटच्या बुधवारी आंतरराष्ट्रीय आवाज जनजागृती दिवस पाळला जातो, त्या औचित्याने तज्ज्ञांनी यासंबंधी जनजागृतीपर माहिती दिली.

कर्कश ध्वनीचा अतिरेक

प्रामुख्याने मोटार वाहतुकीचे आवाज, विनाकारण वाजवले जाणारे हॉर्न, टीव्ही, मोबाईल यांचे आवाज, नवीन तंत्रज्ञानाचे साऊंड सिस्टिम्स, चित्रपट थिएटरमधील आवाज, मिक्सर, फटाके, बांधकामाची यंत्रे आदी अनेक प्रकारचे स्रोत असून, त्यांचे नियंत्रण करणे आजची गरज आहे.

आवाजाचे गंभीर परिणाम

मोठा आवाज वारंवार कानावर पडत असेल, तर त्याचा बौद्धिक आणि कुशल कामात व्यत्यय येऊ शकतो. शिवाय कायम स्वरूपाचा बहिरेपणा, झोपमोड, मानसिक आणि भावनिक असंतुलन, हृदयरोग, रक्तदाब, प्रसंगी मृत्यूही होऊ शकतो. गर्भवती स्त्रीच्या गर्भाला हानी पोचू शकते. गोंगाटामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते.

वृद्धांचा रक्तदाब वाढू शकतो. हृदयविकाराची तीव्रता वाढू शकते. श्रवणशक्ती कमी होऊ शकते. कानात वेदना होऊ शकतात. कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो. मळमळ उलटीचा त्रास होऊ शकतो. फॅक्टरीमधल्या कामगारांना चिडचिड, डोकेदुखी होऊ शकते. प्राण्यांमध्ये काही दुष्परिणाम नोंदवले आहेत.

सहन करण्याची क्षमता ८० डेसिबलपर्यंतच!

आवाजाची तीव्रता डेसिबलमध्ये मोजता येते. डेसिबल घातांकित एकक असून, दर दहा डेसिबलला आवाजाची तीव्रता दहापट वाढते. अर्थात २० डेसिबलचा आवाज १० डेसिबलच्या १० पट, तर ३० डेसिबलचा आवाज १० डेसिबलच्या १०० पट असतो. साधारणपणे ८० डेसिबलपर्यंत आवाज मनुष्य सहन करू शकतो. त्यापेक्षा मोठ्या आवाजामुळे त्रास होतो. या कोलाहालात पक्षांची किलबिल, हवेच्या झुळुकीची शीळ, आपल्याला ऐकू येत नाही. थोडक्यात मानवाने मांडलेल्या पसाऱ्यात निसर्गाचा आवाज हरवून जातो.  (latest marathi news)

International Noise Awareness Day 2024
Health Care : तुमचे मूल तोतरे बोलते का?

आवाजाची तीव्रता व स्वरुप

-० ते ७० डेसिबल : हलका आवाज

-७० ते ८० डेसिबल : त्रासदायक आवाज म्हणजे गर्दीचा रस्ता, संभाषण आदी

-८० ते ९० डेसिबल : त्रस्त करणारा आवाज म्हणजे खूप गर्दीचा अथवा रेल्वेचा आवाज

-९० ते १२० डेसिबल : अतिशय त्रासिक आवाज म्हणजे प्रचंड रहदारीचा किंवा घणाचा आवाज

-१२० ते १३० डेसिबल : डीजे, सार्वजनिक कार्यक्रम आणि बांधकामाठिकाणची विविध यंत्रे, विमान आदी

-मोबाईलमध्ये ११० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे रेकॉर्डिंग होऊ शकत नाही

-हेडफोन्सचा आवाज ७० डेसिबलपेक्षा कमी हवा

-फोनचा माईक ८० ते ८५ डेसिबलपेक्षा वर आवाजाच्या ध्वनिप्रक्षेपित करू शकत नाही

-डीजेचा आवाज १३० डेसिबलपर्यंत असतो, हा एक विरोधाभास आहे

"साधारणपणे ८० डेसिबलपर्यंत आवाज मनुष्य सहन करू शकतो. मात्र, अलीकडच्या काळात त्याची काळजी कुणीही करताना दिसत नाही. मोबाईलवर सतत हेडफोन घालून बातचीत, सोशल मीडिया बघणे व ऐकणे. सोहळ्यांमधील गोंगाट, बॅन्ड, डीजेचा जीवघेणा आवाज. हे थांबले नाही, तर प्रत्येक व्यक्तीची ऐकण्याची क्षमता क्षीण होण्याचा दिवस दूर नाही."

-डॉ. अनिता भोळे, कान-नाक-घसा तज्ज्ञ, जळगाव

International Noise Awareness Day 2024
Summer Health Care : उन्हाकडे दुर्लक्ष करू नका, बचावसाठी काळजी घ्या : वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.