Jalgaon News : चोपड्यात रुग्णालयातील कामकाज वादात; एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी तर दुसऱ्यांवर कारवाईचा बडगा

Jalgaon : उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार काही दिवसांपासून काही डॉक्टर मंडळींच्या कारभारामुळे वादग्रस्त ठरतो आहे.
Sub District Hospital
Sub District Hospitalesakal
Updated on

Jalgaon News : येथील उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार काही दिवसांपासून काही डॉक्टर मंडळींच्या कारभारामुळे वादग्रस्त ठरतो आहे. सर्पदंश झालेल्या वृद्धेला वेळेवर उपचार न मिळाल्याने निधन झाले, तर एका गर्भवती स्त्री रुग्णाला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मरण यातना सहन कराव्या लागल्याच्या तक्रारीवरून मोर्चे,रास्ता रोको झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रहास पाटील यांना दोषी ठरवत त्यांना तत्काळ कार्यमुक्त केले असून डॉ.तृप्ती पाटील यांची चौकशी लावली आहे. (Investigation of medical officer in hospital dispute in Chopda )

माचला (ता.चोपडा) येथील रिंकू प्रवीण बारेला ही आदिवासी महिला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली असताना उपजिल्हा रुग्णालयात ड्यूटीवर असलेले डॉ.चंद्रहास पाटील यांनी तपासणी करून तिला सीझरचा सल्ला देऊन तातडीने जळगावला पाठविण्यास सांगितले व रुग्णांच्या नातेवाईकांशी हुज्जत घातली. दुसऱ्या दिवशी ही महिला खासगी दवाखान्यात नॉर्मल प्रसूत झाली. (latest marathi news)

Sub District Hospital
Jalgaon News : मोकाट जनावरांची शेतशिवारात नासधूस; शेतकरी हैराण

या विरोधात माचला येथील उपसरपंच नितीन निकम यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला जाब विचारत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे लेखी तक्रार देखील केली होती. तर दुसऱ्या घटनेत शहरातील पुंडलिक माळी ( ६७ ) या वृद्धास ३ जुलैला शेतात सर्पदंश झाला असताना त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्याविरोधात नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालया समोर रास्ता रोको करून आंदोलन केले होते.

चौकशी होऊन कारवाई

आमदार लता सोनवणे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली. निळे निशान संघटनेने देखील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश पाटील यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. या प्रकारची चौकशी करून डॉ.चंद्रहास पाटील यांना तत्काळ कार्यमुक्त केले होते. तर दुसऱ्या घटनेतील डॉ.तृप्ती पाटील यांची चौकशी सुरू आहे त्यांचा अहवाल लवकरच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठवला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश पाटील यांनी दिली आहे.

Sub District Hospital
Jalgaon News : मृत शेखच्या कुटुंबाला 51 हजारांची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.