जामनेर : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या नगरपालिकेच्या अतिक्रम निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांना अतिक्रमणधारकांनी जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच शासकीय कामात अडथळा आणला. या विरोधात सोमवारी (ता. २६) पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी भारतीय मजदूर संघ व सफाई कामगार संघटनेच्या माध्यमातून पोलिस ठाण्यावर मोर्चा नेऊन धरणे आंदोलन केले. (Jamner abused municipal employees Outcry of encroachers)