Jalgaon News : जामनेर नगर परिषदेकडून दिव्यांगांना निधी वाटप; 5 टक्के निधीतून 114 लाभार्थ्यांना मिळाला दिलासा

Jalgaon News : २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील नगर परिषद महसुली उत्पन्नातून ५ टक्के ३ लाख ९१ हजार रुपयांचा निधी ११४ दिव्यांग लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला.
Fund
Fundesakal
Updated on

Jalgaon News : जामनेर नगर परिषद कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील नगर परिषद महसुली उत्पन्नातून ५ टक्के ३ लाख ९१ हजार रुपयांचा निधी ११४ दिव्यांग लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला. त्यामुळे दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.

माजी नगराध्यक्षा साधना महाजन, प्रशासक तथा मुख्य अधिकारी नितीन बागुल, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, माजी नगरसेवक खलील अहमद यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.(Jalgaon Jamner Nagar Parishad distributes funds to disabled)

२०२३-२४ या आर्थिक वर्षात जामनेर नगर परिषद हद्दीतील ३८९ दिव्यांग बांधवांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी २७५ दिव्यांग बांधवांना यापूर्वी दहा लाख २ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. उर्वरित ११४ दिव्यांग बांधवांना सोमवारी (ता. ११) निधी वाटप करण्यात आला.

माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जितेंद्र पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. (latest marathi news)

Fund
Jalgaon News : रेशन दुकानात आता ‘आय स्कॅनर’; रेशन दुकानांत चाचपणी सुरू

दिव्यांग शासकीय योजनेबाबत विश्‍वशांती दिव्यांग संस्थेचे पवन माळी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी नितीन बागुल, उपमुख्याधिकारी रविकांत डांगे यांनीही योजनांची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्‍वशांती दिव्यांग संस्थेचे पवन माळी, रवी झाल्टे, महेंद्र माळी, अंबिका टहाकळे, श्रावण धमाले, किशोर माळी यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Fund
Jalgaon News : जळगाव जिल्ह्याचा 2047 पर्यंत होणार सर्वंकष विकास; कृषी, सेवा, उद्योगावर भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.