Jalgaon News : जळगाव जनता बँकेला 21 कोटींचा नफा : सतीश मदाने; सभासदांना 10 टक्के लाभांश

Jalgaon News : छोट्या लोकांची मोठी बँक’, असा उल्लेख करत बँकेच्या एकंदर उलाढालीची माहिती अध्यक्ष सतीश मदाने यांनी देऊन सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा रविवारी(ता. २३) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
Ajinkya d. Y. President Satish Madane and Director felicitating Bharat Amalkar at the annual meeting of Jalgaon Janata Sahakari Bank for receiving doctorate from Patil University.
Ajinkya d. Y. President Satish Madane and Director felicitating Bharat Amalkar at the annual meeting of Jalgaon Janata Sahakari Bank for receiving doctorate from Patil University.esakal
Updated on

जळगाव : जळगाव जनता सहकारी बँकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३३४५.३८ कोटींच्या व्यवसायाचा पल्ला गाठला. मागील आर्थिक वर्षात बँकेला २१.३६ कोटींचा नफा झाला. ‘छोट्या लोकांची मोठी बँक’, असा उल्लेख करत बँकेच्या एकंदर उलाढालीची माहिती अध्यक्ष सतीश मदाने यांनी देऊन सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा रविवारी(ता. २३) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. (Jalgaon Janata Bank profit of 21 crores)

छत्रपती संभाजीराजे सभागृहात झालेल्या बँकेच्या ४६व्या सभेच्या प्रारंभी वंदे मात्रमने वार्षिक सभेला सुरवात झाली. दिवंगत मान्यवर व्यक्ती, सभासदांना संचालिका डॉ. आरती हुजुरबाजार यांनी श्रध्दांजली अर्पण केली. विषयांचे वाचन सीईओ संजय नागमोती यांनी केले. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.

बँक व्यवस्थापन समिती सदस्य मोहन रावतोळे, निखिल कुलकर्णी, अशोक माणियार तसेच केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर, बँकेचे संचालक अनिल राव, माजी अध्यक्ष संजय बिर्ला यांच्यासह बँकेचे सभासद, स्थानिक शाखेचे शाखा समन्वयक समिती सदस्य, कर्मचारी प्रतिनिधी हेमंत चंदनकर, ओंकार पाटील सभेस उपस्थित होते.

बँकेच्या या वर्षातील आर्थिक प्रगतीचा आढावा संचालक सीए नितिन झवर यांनी सादर केला. भरत अमळकर व हेमा अमळकर यांचा सत्कार करण्यात आला. संध्या देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. (latest marathi news)

Ajinkya d. Y. President Satish Madane and Director felicitating Bharat Amalkar at the annual meeting of Jalgaon Janata Sahakari Bank for receiving doctorate from Patil University.
Latest Marathi News Live: आम आदमी पार्टीची आसाम राज्य कार्यकारिणी विसर्जित

सभासदांचा सर्वांगीण विकास

अध्यक्ष सतीश मदाने यांनी सभेला संबोधन करताना सांगितले, की सभासदांच्या सर्वांगीण विकासाचे व आर्थिक सक्षमतेचे व्रत घेतलेल्या जळगाव जनता सहकारी बँकेने गेल्या ४५ वर्षात ४३ शाखांसह भरीव प्रगती केली. जळगाव जनता बँकचे सुमारे ३ लाख ४१ हजारांपेक्षा जास्त ग्राहक विविध प्रकारचे व्यवहार बँकेच्या माध्यमातून करीत आहे. बँकेची एकूण सभासद संख्या ६१हजार पेक्षा जास्त आहे. विशेष बाब म्हणजे बँकेस सतत ऑडीट वर्ग अ प्राप्त झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

सेवा समूहाचा सन्मान : अमळकर

केशवस्मृती समूह सेवाक्षेत्राखाली आर्थिक क्षेत्र ठेवले, ही दूरदृष्टी आचार्य दादांची. हा सन्मान सगळ्यांचा आहे. सेवेचा, दादांच्या प्रेरणेचा, संघ संस्काराचा आहे. आता हा सेवा समूह खूप मोठा झाला आहे. याच कार्याची दखल घेऊनच डी. वाय. पाटील समूहातर्फे मला प्राप्त डॉक्टरेट हा आपल्या सर्वांचाच बहुमान असल्याचे मत भरत अमळकर यांनी व्यक्त केले.

Ajinkya d. Y. President Satish Madane and Director felicitating Bharat Amalkar at the annual meeting of Jalgaon Janata Sahakari Bank for receiving doctorate from Patil University.
Seventh Pay Commission : सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम होणार अदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.