Jalgaon Crime News : जीएस निवडीवरून ज्युनिअरचा रात्रभर छळ; शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात तक्रार प्राप्त

Jalgaon Crime : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इंटर्नशिप करणाऱ्या सिनिअरने दारू पाजून बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता.५) मध्यरात्री घडली.
Crime
Crime esakal
Updated on

Jalgaon Crime : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इंटर्नशिप करणाऱ्या सिनिअरने दारू पाजून बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता.५) मध्यरात्री घडली. इतकेच नव्हेतर विद्यार्थ्याच्या मांडीवर धारदार चाकूने वार करून रात्रभर अमानुष छळही केल्याचे समोर आले आहे. शिरसोलीरोडवर घडलेल्या या प्रकाराची पीडित विद्यार्थ्याने प्राचार्यासह पोलिसांत तक्रार दिली आहे. (Jalgaon Junior harassed all night over GS selection)

मात्र शनिवारी (ता.६) रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मारहाण करणारा यापूर्वी विद्यार्थी प्रतिनिधी होता. तर हा रॅगिंगचा प्रकार असून संबंधितांविरुद्ध ॲण्टी रॅगिंग अंतर्गत कारवाईची मागणी अभाविपने केली आहे. शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणारा पीडित विद्यार्थी महाबळ परिसरातील मोहन नगरात भाड्याने खोली करून वास्तव्यास आहे.

शुक्रवारी (ता.५) त्याचाच सिनिअर आणि इंटर्नशिप करणाऱ्या भावी डॉक्टरने फोन करून त्याच्या खोलीवर बोलावले. मात्र, ज्युनिअरने जाण्यास नकार दिल्याने सिनिअर वर्गमित्राला घेऊन मोहन नगर येथे धडकला. धाकात घेत पीडित विद्यार्थ्याला स्वत:च्या खोलीवर नेले. तिथे यथेच्छ मद्यपान करून ज्युनिअरलाही बळजबरी दारू पाजत चामडी पट्ट्याने पाठ सोलून काढली. इतक्यावरच छळ थांबला नाही तर, चक्क मांडीवर चाकूने वार केले. (latest marathi news)

Crime
Jalgaon Protest News : भुसावळला ट्रकखाली डोके ठेवून आंदोलन! सणासुदीत रस्त्याचे खोदकाम केल्याने ‘रास्ता रोको’

अधिष्ठातांकडे रात्रीच तक्रार

मारहाणीनंतर पीडित विद्यार्थ्याला पहाटेपर्यंत दुचाकीवर घेऊन दोघे भावी डॉक्टर शहरात फिरले. पीडित ज्युनिअर विद्यार्थ्याने विनवण्या केल्यावर त्याला नेहरू नगर येथील खोलीवर सोडून दिले. पीडित विद्यार्थ्यास त्याच्या रूम मेटने धीर दिल्यावर रात्रीच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना फोन करून गुदरलेला प्रसंग सांगितला. सकाळी पोलिस ठाण्यातही तक्रार दिली.

"गौरेश जावरे नावाच्या विद्यार्थ्याला राज जोगदंडकडून मारहाण झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. महाविद्यालयीन शिस्तीचा भाग म्हणून अंतर्गत समिती याविषयी चौकशी करून कारवाई करेल. घडलेला प्रकार महाविद्यालयाबाहेरचा आहे. या प्रकरणी पोलिसांनाही तक्रार दिली आहे." - डॉ. अभिजित अहिरे, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

Crime
Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभेच्या मैदानात ठाकरेंनी उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती? स्मिता वाघ यांना देणार मोठी टक्कर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.