Jalgaon News : ‘बोरी’तून कंकराज प्रकल्पास जलदान! परिसरातील सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला; 30 क्यूसेकने विसर्ग

Jalgaon News : बोरी उजव्या कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे कंकराज परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असून, याबाबत परिसरातील ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.
Water released from Bori right canal to Kankaraj project
Water released from Bori right canal to Kankaraj projectesakal
Updated on

पारोळा : कंकराज (ता. पारोळा) येथील लघु प्रकल्प हा पुनर्भरणातून दरवर्षी भरला जातो. यावर्षी देखील बोरी धरणातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नदी प्रवाहात पाणी सोडले जात आहे.

त्याच पार्श्वभूमीवर बोरी उजवा कालव्यातून कंकराज लघु प्रकल्पास जलदान केले जात आहे. दरम्यान, बोरी उजव्या कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे कंकराज परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असून, याबाबत परिसरातील ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले. (Kankaraj project water donation from Bori)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.