गणपूर (ता. चोपडा) : खानदेशात यावर्षी लागवड होणारा खरीप कांद्याचा व लेट खरीप कांद्याचा हंगाम आता उत्तरार्धात पोहोचलेला दिसून येत आहे. साधारणपणे पंधरा दिवसांत ही लागवड पूर्णत्वाकडे जाईल. सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे भाव पाहता हे पीक शेतकऱ्यांची आवडीचे होत असले तरी रोपवाटिकांमध्ये रोपच मिळेनासे झाल्याने लागवड क्षेत्रावर बंधने आलेली आहेत. तरीदेखील खानदेशचा विचार करता, जळगाव जिल्ह्यात लेट खरीप कांद्याचे आतापर्यंतचे अनुभव पाहता सुमारे आठ ते दहा हजार एकरांवर लेट खरीप कांद्याची लागवड होणे शक्य आहे. (Kharif onion which is planted this year in Khandesh has reached )
तेवढीच लागवड धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये विचारात घेता खानदेशात एकूण खरीप व लेट खरीप कांद्याचे क्षेत्र २० हजार एकरांपर्यंत पोहोचू शकते. कांद्याचे पीक सध्याच्या परिस्थितीला लागवड होऊन बऱ्यापैकी झालेले आहे. सुरुवातीला लागवड झालेल्या कांद्याचे अजून दोन महिन्यांत पीक हातात येईल, अशा प्रकारचा राहील. एकूण जळगाव जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात पूर्ण वर्षभरात साधारणपणे पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक घेतले जाते.
त्यात खरीप व लेट खरीपचा विचार करता साडेतीन ते पावणेचार हजार हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतले जाते. ठराविक शिवारांमध्ये हे पीक घेतले जात असल्याने अन्य गावांमध्ये त्याची लागवड होत नाही. एकूण खानदेशचा विचार करता जळगाव जिल्ह्यात किनगाव, यावल, नायगाव, दोनगाव, डांभूर्णी, चुंचाळे, वर्डी, मंगरूळ, माचला, अडावद, वटार, वडगाव, पंचक, लासूर, मराठे, शिकावल, खर्डी, नारोद, खरद, गणपुर, गलवाडे, हातेड, पिळोदे, गांधली, दहिवद, धरणगाव, पष्टाणे, पिंप्री, वराड यांसह चाळीसगाव तालुक्यात व एरंडोल तालुक्यांत काही शिवारांमध्ये कांद्याची लागवड होते. (latest marathi news)
तरी पश्चिम खानदेशचा विचार करता दुसाने, फोफादे, इंधवे, कढरे, कर्ले, परसोडे, तामथरे, जखाने, लामकानी, डोमकानी, मेहरगाव, बोरीस, तिसगाव, धंडाने,कापडणे, देवभाणे, निजामपूर, जैताणे, गोताने, खोरी, टिटाने, शहादा, सोनवद, सोमावल, कळंबू, कोठली, बामखेडा, कुकावल व नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांत कांद्याचे पीक घेतले जाते. अजून काही दिवस लेट खरीप कांद्याची लागवड होणार आहे. आता ही लागवड उत्तरार्धात आली आहे. तर येत्या काही दिवसांत उन्हाळी कांद्यासाठी रोपवाटिकांमध्ये रोप टाकण्याची घाई शेतकऱ्यांमध्ये दिसून येईल.
निर्यातीला मिळाली चालना
एकंदरीत पाहता कांद्याच्या भावात निर्यात शुल्क कमी केल्यानंतर निर्यातीला चालना मिळाली आहे. आखाती देशांसह श्रीलंका, बांगलादेश या देशांमध्ये आपल्याकडील कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे लागवड क्षेत्र वाढीची आशा आता दिसू लागली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे रोपवाटिकेमध्ये रोप शिल्लक आहे ते व काही शेतकरी रोप विकत घेऊन लागवड करण्याची तयारी करताना दिसून येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.