Jalgaon Heavy Rain: खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची भीती! परतीच्या पावसाचा फटका; चोपडा तालुक्यातील बळीराजा नुकसानीने चिंताग्रस्त

Latest Agriculture News : खरीप हंगामातील पिकांपासून शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. परंतु, परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
heavy rain damage crop farmer
heavy rain damage crop farmeresakal
Updated on

धानोरा (ता. चोपडा) : परतीच्या पावसाने बळीराजाला मोठा फटका बसला आहे. शेतात काढणीला आलेल्या कापूस, मका, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात यावर्षी मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. (Kharif production feared to decline)

खरीप हंगामातील पिकांपासून शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. परंतु, परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगल्या प्रकारे बरसला. त्यामुळे खरीप हंगाम चांगला होईल व पावसाचे पाणी वेळेत मिळाल्याने पिकांची वाढही चांगली झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला होता. परंतु, सध्या परतीच्या पावसाने सर्वत्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी हमखास चार पैसे मिळवून देतो. खरीप हंगामातील पिकांतून चांगली आर्थिक उलाढाल होत असते. सणासुदीसाठी हा हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. खरीप हंगामात येणाऱ्या पैशांतून शेतकऱ्याचा दसरा व दिवाळी सण अवलंबून असतो. खरीप हंगामासाठी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र बिघडून टाकले आहे. (latest marathi news)

heavy rain damage crop farmer
Jalgaon News : सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करणार! ‘चोसाका’ कामगारांचा निर्णय; वेतन, पीएफ न मिळाल्याचे तहसीलदारांना निवेदन

बळीराजा आर्थिक विवंचनेत!

परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला, त्याचा फटका काढणीला आलेल्या पिकांना बसत असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हातातोंडाला आलेली पिके वाया जात असल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. यावर्षी वरुणराजाची सुरुवात समाधानकारक, पुरेसा व पिकाला चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरिपाचा हंगाम चांगलाच बहरला होता, कापसाचे पिक डोलू लागले होते.

परंतु, हातातोंडाशी आलेले पीक आता परतीच्या पावसावर आधारित असल्याने बळिराजा चिंताग्रस्त झाला आहे. जोरदार पावसामुळे शेतात उभे असलेले ज्वारी पीक काळे पडण्याची भीती असून, ज्वारीला मिळणाऱ्या दराला मोठा फटकाही बसणार आहे. खरीप हंगामासाठी घेतलेले खते, बियाणे मजुरी याचा खर्च वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

"परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेले कांदा पिकाचे नुकसान होऊ लागले आहे. टोमॅटो पिकाच्या उत्पादनावर पावसामुळे परिणाम होतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागणार, असे वाटते."

- नरेंद्र पाटील, प्रगतीशील शेतकरी, लोणी (ता.चोपडा)

"मी कापूस उत्पादक शेतकरी आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या कापसाचे बोंड गळून पडत आहे. त्यामुळे उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. म्हणून शासनाने पीकविमा मंजूर करून तत्काळ शेतकऱ्यांना भरपाई द्यावी."- प्रसन्न महाजन, प्रगतशील शेतकरी, धानोरा (ता.चोपडा).

heavy rain damage crop farmer
Jalgaon Cotton Crop Crisis: वेचणीला आलेल्या कापसाला पावसाचा फटका! भरपाईची मागणी; म्हसवे शिवारात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.