Farmers while cultivating agriculture.
Farmers while cultivating agriculture.esakal

Jalgaon Kharif Season : मशागत, बियाणे खरेदीनंतर शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

Kharif Season : मृग नक्षत्रात तालुक्यातील शेतकऱ्यांची मशागत अंतिम टप्प्यात आली आहे. त्यात मेमधील कपाशीची लागवड पूर्णत्वास आली आहे.
Published on

Jalgaon Kharif Season : मृग नक्षत्रात तालुक्यातील शेतकऱ्यांची मशागत अंतिम टप्प्यात आली आहे. त्यात मेमधील कपाशीची लागवड पूर्णत्वास आली आहे. पारोळा तालुक्यातील खरीप हंगाम सर्वसाधारणपणे क्षेत्र ५२ हजार हेक्टर आहे. मागील वर्षी पेरणी क्षेत्र ५१ हजार हेक्टर होते. यंदा प्रस्तावित पेरणी क्षेत्र ५१२०० हेक्टर असून, त्यापैकी प्रमुख पीक कपाशी ४५ हजार हेक्टरवर लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक २ लाख १५ हजार बियाण्यांच्या पाकिटांची मागणी केली होती. (Farmers waiting for rain after cultivation and purchase of seeds )

त्याप्रमाणे बियाणे उपलब्ध आहे. दुसरे प्रमुख पीक मक्याची २२५० हेक्टरवर पेरणी होणार असून, बाजरीची १,३२५ हेक्टर पेरणीबाबत नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक बियाणे उपलब्ध झाले आहे. कडधान्य तूर, मूग, उडीदाचे बियाणे उपलब्ध झाली आहेत. सद्य:स्थितीत बागायती कापसाची लागवड सुरू आहे. साधारण २५००-३००० हेक्टरवर लागवड झाली आहे. पाऊस पडल्यानंतर जिरायत कपाशी व इतर कडधान्ये व तृणधान्ये पिकांची पेरणी होईल.

दरम्यान, तालुक्यात जिल्हा बँकेकडून तब्बल सात हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, आजपर्यंत पाच हजार शेतकऱ्यांना जिल्हा बँकेमार्फत कर्जवाटप झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जवाटपसाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यांनाही लवकरच कर्जपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा बँकेकडून देण्यात आली. दरम्यान, यंदा पीकविमा १ जुलैपासून सुरू होणार आहे. तर खरीप व रब्बी पीकविमा अद्यापपर्यंत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. (latest marathi news)

Farmers while cultivating agriculture.
Kharif Season : खरीप पेरणीचे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट; सोयाबीनच्या पेरणीची शक्यता

''खतांची उपलब्धता मागणीप्रमाणे पुरेशा प्रमाणात आहे. सद्यस्थिती कुठल्या खतांची टंचाई नाही. कपाशी लागवड करताना शेतकऱ्यांनी जमीन व पाण्याची उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या वाणांची निवड करावी. सर्व वाण बीटी संकरित आहेत. फक्त उत्पादन करणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत. शेतकऱ्यांनी एकाच विशिष्ट वाणाचा आग्रह करू नये.''-दत्तात्रेय ढमाळे, तालुका कृषी अधिकारी, पारोळा

''खरीप व रब्बी हंगामात पीकविमा काढला. मात्र, आतापर्यंत तो मिळाला नाही. बियाणे खरेदीसाठी मोठी तारांबळ उडाली. त्यामुळे संबंधित विभागाने याबाबत धोरण आखणे गरजेचे आहे.''-सखुबाई पाटील, शेतकरी

Farmers while cultivating agriculture.
Jalgaon Kharif Season : बाजारभावावर खरिपाचे गणित अवलंबून; शेतकऱ्यांसमोर पीक नियोजनाची अडचण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com