Jalgaon: खरिपात 86 हजार हेक्टरवर कपाशी लागवडीचे उद्दिष्ट! चाळीसगाव तालुक्यातील चित्र; 3 लाख 16 हजार बियाण्याच्या पाकिटांची मागणी

Jalgaon News : शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीवरच अधिक भर राहिल्याने कृषी विभागाने यंदा बियाणांची ३ लाख १६ हजार पाकिटांची मागणी केली आहे, अशी माहिती येथील तालुका कृषी कार्यालयाने दिली.
Seeds
Seedsesakal
Updated on

चाळीसगाव : कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात ६७ हजार हेक्टरवर बीटी कपाशी लागवडीची तयारी केली आहे. एकूण ८६ हजार १५३ हेक्टर खरीप लागवडीचे प्रस्तावित क्षेत्र ठरविले असून, यात कापूस मुख्य पीक राहणार आहे. त्यानंतर तृणधान्यांची १६ हजार ९३५ हेक्टर, कडधान्य १ हजार ४८४ हेक्टर, गळीतधान्य ४४० हेक्टरवर पेरणी होणार आहे.

शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीवरच अधिक भर राहिल्याने कृषी विभागाने यंदा बियाणांची ३ लाख १६ हजार पाकिटांची मागणी केली आहे, अशी माहिती येथील तालुका कृषी कार्यालयाने दिली. (Kharipat aims to cultivate cotton on 86 thousand hectares)

तालुक्याला गिरणा नदी वरदान ठरली आहे. शिवाय मन्याड, शहरातून वाहणाऱ्या तितूर व डोंगरी नदीमुळे पाण्याबाबत अर्ध्या तालुक्यात चांगली परिस्थिती आहे. मात्र, ही परिस्थिती सर्वस्वी पावसावरच अवलंबून आहे. मागीलवर्षी पुरेसा पाऊसच न झाल्याने यंदा सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. गिरणा पट्ट्यात कधीही विहिरी आटत नव्हत्या, अशा भागातही पाण्याबाबत सध्या गंभीर परिस्थिती आहे. मागील हंगामात शेतकऱ्यांनी जोमाने पेरण्या केल्या. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.

बियाणांची मागणी

बीटी बियाण्याच्या एका पाकिटाची शासनाने निर्धारित केलेली किंमत बीजी-१ची ६३५ रुपये व बीजी-२ची ८६४ रुपये आहे. १५ मेपासून बियाणे खरेदी सुरू झाली आहे. मान्यताप्राप्त कृषी केंद्रनिहाय बियाणे विक्रीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत.

शेतकऱ्यांची बी-बियाणे व खतांच्या खरेदीत फसवणूक होऊ नये, यासाठी तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. तालुक्यात सर्वाधिक मागणी कपाशी बियाणालाच आहे. मक्याच्या ७५१ व ७४१ या बियाण्याची अनेक शेतकरी लागवडीसाठी दुकानांवर मागणी करीत आहेत. (latest marathi news)

Seeds
Jalgaon News: केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूशखबर! नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ; पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

लागवडीला सुरवात

यंदा बागायती कपाशी २ हजार ७०७ हेक्टर व मका ११९ हेक्टरवर लागवडीचे नियोजन आहे. तालुक्यातील बहुतांश भागांत पाऊस झाल्यामुळे दोन ते तीन दिवसांत २८ ते ३० टक्के कपाशी व मक्याची लागवड होणार आहे. आतापर्यंत काही भागात लागवड झाली आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

"शेतकऱ्यांना कोणी जास्तीच्या दराने बियाणे अथवा खते विकत असेल, तर त्याची जिल्हा परिषदेच्या ७४९८१९२२२१ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करावी. तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाऊन संबंधित दुकानदाराची चौकशी करून तो दोषी आढळल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल."- एस. ई. चव्हाण, प्र. तालुका कृषी अधिकारी, चाळीसगाव

Seeds
Jalgaon News : रेल्वे मार्गाशेजारी बांबू लागवडीस संमती! जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वेच्या भुसावळ विभागाचे पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com