Jalgaon Crime News : किशोर सोनवणे खून प्रकरण! मारेकऱ्यांनी गाठला क्रूरतेचा कळस; निपचीत पडल्यावरही करीत होते हल्ला

Jalgaon Crime : शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील भानू हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलावरच धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून किशोर अशोक सोनवणे याची हत्या करण्यात आली.
crime
crime esakal
Updated on

Jalgaon Crime News : शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील भानू हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलावरच धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून किशोर अशोक सोनवणे याची हत्या करण्यात आली. किशोर निपचीत पडल्यावरही अत्यंत क्रूरपणे मारेकरी त्याच्यावर वार करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. या प्रकरणात एकूण सात संशयितांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली असून, दोन मारेकरी अद्याप फरारी आहेत. (Kishor Sonawane murder case killers reached heights of brutality)

मृताचे वडील अशोक श्रावण सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी गुरुवारी (ता. २३) प्रशांत काकडे, रूपेश काकडे (वय २७), ईश्वर काकडे (२३), मयूर कोळी या चार संशयितांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी (ता. २४) आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली.

एक संशयित भुसावळला व दुसरा संशयित हा अमळनेरला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली. दोघांना शनिवारी (ता. २५) न्यायालयात हजर करण्यात आल्यावर त्यांनाही २७ मेपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

crime
Jalgaon Crime News : 30 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; धरणगावातील प्रकार

पळून जाण्यापूर्वीच अटक

भुसावळहून दुर्लभ कोळी याला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर अमळनेर येथून मुख्य संशयित रूपेश मनोहर सोनार याला अमळनेर रेल्वेस्थानकावरून अटक करण्यात आली. रूपेशकडे बॅग होती. तसेच, तो बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडे चॉपरही आढळून आला आहे. सहाय्यक निरीक्षक विठ्ठल पाटील, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, राहुल पाटील, किरण वानखेडे, अनिल कांबळे, राहुल घेटे, गजानन वाघ यांच्या पथकाने संशयितास अटक केली.

गँगचा म्होरक्या सापडेना...

मारेकऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणे किशोर सोनवणे याची हत्या केल्याचे सीसीटीव्हीत चित्रीत झाले असून, मारेकऱ्यांनी हॉटेलमध्येच मारल्यावर किशोरला ओढत हॉटेलबाहेर आणून निपचीत पडला असताना त्याच्यावर वार केल्याचे सीसीटीव्हीत चित्रीत झाले आहे. फरारी संशयित नीलेश ऊर्फ लोमेश सपकाळे, अमोल छगन सोनवणे यांचा शोध घेण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी सांगितले.

crime
Jalgaon Crime News : महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; रामानंदनगर पोलिसांत तक्रार दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.