Jalgaon News : ‘त्या’ मजूर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Jalgaon News : औद्योगिक वसाहत परिसरात ई-सेक्टरमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी महिला कामगाराचा मंगळवारी (ता. ८) पहाटे चारला मृत्यू झाला.
Death
Deathesakal
Updated on

जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरात ई-सेक्टरमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी महिला कामगाराचा मंगळवारी (ता. ८) पहाटे चारला मृत्यू झाला. या प्रकरणी घटनेला जबाबदार इमारत मालक आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने मृत्यूस जबाबदार असलेल्या संशयितांच्या अटकेची मागणी केली आहे. (Laborer woman died during treatment who fell from third floor )

प्रमिलाबाई शंकर चव्हाण (वय ५५ रा. सुप्रीम कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. औद्योगिक वसाहत परिसरातील सुप्रीम कॉलनीत प्रमिलाबाई शंकर चव्हाण (वय ५५) परिवारासह वास्तव्याला होत्या. एमआयडीसीतील ई-सेक्टरमधील निर्माणाधीन इमारतीच्या साईटवर प्रमिलाबाई चव्हाण काही दिवसांपासून काम करीत होत्या. बुधवारी (ता. २) दुपारी तीनच्या सुमारास प्रमिलाबाई तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या.

Death
Jalgaon News : धुमाकूळ घालणारे माकड जेरबंद; अनेकांना घेतला होता चावा

गेल्या सहा दिवसांपासन त्यांच्यावर अतिदक्षता विभागात शर्तीचे उपचार सुरू असताना, मंगळवारी (ता. ८) पहाटे चारला त्यांचा मृत्यू झाला. प्रमिलाबाई ज्या ठिकाणी काम सुरू होत्या. त्याठिकाण बांधकाम ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान (रा. जळगाव) यांच्यासोबत वाद झाला होता. याबाबत प्रमिलाबाई यांनी पती शंकर चव्हाण यांना सांगितले होते. प्रमिलाबाई तिसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

मृत्यूपूर्वी महिलेने पतीला मला कुणीतरी मागून ढकलून दिले, असे सांगितले. परिणामी, पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या बांधकाम मालक धीरज युवराज महाजन आणि ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान यांना अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रमिलाबाई चव्हाण यांचे पती शंकर चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर जखमी महिला कामगारावर उपचाराचा खर्चही बांधकाम मालक व ठेकेदाराने दिलेला नाही, तसेच आर्थिक मदतही केलेली नाही. उलट त्यांनी पोलिसात न जाण्यासाठी धमक्या दिल्या, अशी माहिती शंकर चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Death
Jalgaon News : तिसऱ्या मजल्यावरून कोसळून महिला मजूर गंभीर; कामगार कार्यालयासह प्रशासन अनभिज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.