Jalgaon Bribe Crime : मुकादमपदावरून स्थगिती दिल्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्तांकडे सुनावणी सुरू असताना, तक्रारदाराकडून निकाल लावण्यासाठी ५० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती ३६ हजारांची लाच स्वीकारताना कामगार निरीक्षकाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. चंद्रकांत पाटील (वय ५७, रा. जळगाव) असे अटक केलेल्या कामगार निरीक्षकाचे नाव आहे. ()