Land Records Department : आता शेतकऱ्यांमधील वादावादी मिटणार! शेतीची अचूक मोजणी

Jalgaon News : राज्य सरकारकडून ‘ई-मोजणी २.०’ संगणक प्रणाली सुरू झाली आहे. या प्रणालीद्वारे जीआयएस आधारित रोव्हर्सद्वारे शेतजमिनीची मोजणी केली जात आहेत.
Land Records Department
Land Records Department esakal
Updated on

अमळनेर : राज्य सरकारकडून ‘ई-मोजणी २.०’ संगणक प्रणाली सुरू झाली आहे. या प्रणालीद्वारे जीआयएस आधारित रोव्हर्सद्वारे शेतजमिनीची मोजणी केली जात आहेत. त्यामुळे नकाशामध्ये प्रत्येक जमिनीच्या हद्दीचे तंतोतंत अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत. परिणामी, जमिनीची अचूक मोजणी होऊन शेतकरी आणि जमीनधारकांमधील वाद कमी होण्यास मदत होणार आहे. (Jalgaon Land Records Department state government has started E-Mojani 2.0 computer system)

सद्यःस्थितीत राज्यातील १०६ तालुक्यांमध्ये या ‘ई-मोजणी २.०’ प्रणालीच्या माध्यमातून शेतजमीन मोजणी सुरू झाली आहे. या वर्ष अखेरपर्यंत ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याचा भूमिअभिलेख विभागाचा मानस आहे. राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागाकडून पूर्वी ज्या वेळी जमिनीची मोजणी केली जात होती त्या वेळी शेजारच्या जमीनधारकांना मोजणीच्या वेळी हजर राहाण्यास सांगितले जात असे.

त्यांच्यासमोर जमिनीची मोजणी करून सीमेचे दगड, निशाण्या लावल्या जात. तसेच मोजणी, सर्व्हे त्यांच्यासमोर केली ते सर्वांना मान्य असल्याबाबत तुमच्या व शेजारच्या जमीनमालकांच्या सह्या घेतल्या जात होत्या. काळाच्या ओघात आता सर्वच अपडेट होताना दिसत आहे. (latest marathi news)

Land Records Department
Jalgaon Fire Accident : कंपनी व्यवस्थापकासह मालकाला अटक! केमिकल कंपनी स्फोटातील जखमी 2 कामगारांचा मृत्यू

याच पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख विभागाकडून मोजणी केलेल्या सर्व जमिनींचे जीआयएस आधारित मोजणी नकाशे अक्षांश, रेखांशसह सरकारच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पुरविले जाणार आहेत. त्यामुळे एखाद्या सरकारी मोजणी झालेल्या जमिनीचे नकाशे शेतकऱ्यांना तत्काळ ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.

आता शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी केल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. त्यांना मोबाईलवरच जमीन मोजणी नकाशे ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Land Records Department
Jalgaon Lok Sabha Election : प्रा. मनोज पाटील यांच्या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.