Jalgaon Crime News: जळगाव LCBने ‘त्या’ पोलिसांना धुळ्यातून घेतले ताब्यात; अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने टळली अटक!

अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने टळली अटक; मात्र, दोघांची नियंत्रण कक्षात बदली
Jalgaon Crime News
Jalgaon Crime Newssakal
Updated on

Jalgaon News : एरंडोलच्या एका शिक्षकाची मोटारसायकल चोरी प्रकरणात धुळ्यातील गॅरेज चालकास जळगाव गुन्हे शाखेने (ता.३) अटक केली होती. त्याला पोलिसांनी प्रसाद दिल्यावर त्याने आपल्या डोक्यावर धुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा धक्कादायक प्रकार सांगितला.

यासंदर्भात पुराव्यानिशी जळगाव एलसीबी धुळ्यात धडकली. दोघा संशयित पोलिसांच्या अटकेची तयारी केली. मात्र, ‘आम्ही चौकशी करतोय’ असे सांगत धुळे पोलिसांनी वेळ मारुन नेली आणि या गुन्ह्यातील त्या संशयित पोलिसांची अटक टाळली गेली. (Jalgaon LCB arrests cops from Dhule in teacher bike theft case Arrest avoided by intervention of officer transfer Jalgaon Crime news)

एरंडोलच्या लक्ष्मीनगर येथील रहिवासी संजय रमेश पाटील यांच्या मालकीची मोटारसायकल (एम. एच. १९ बीएक्स ६५९२) दोन वर्षांपूर्वी ११ जुलै २०२० च्या रात्री चोरीस गेली होती. याप्रकऱणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना जळगाव एलसीबीने धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील गॅरेजचालक जुबेर रशीद उर्फ बबलू पठाण याला अटक केली.

त्याची चौकशी केल्यावर त्याने तीन चोरीच्या मोटारसायकली काढून दिल्या. इतर गुन्ह्यात चौकशी करताना बबलूने धुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा डोक्यावर हात असून चोरीची वाहने त्यांच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जात असल्याचा धक्कादायक खुलासा केला.

यात दोघांची नावे समोर आली असून चोरीच्या मोटारसायकलींची विल्हेवाट लावण्याचा मोठा धंदा गेल्या पाच वर्षांपासून दोघेही चालवत असल्याचे सांगण्यात आले.

दोघांची अटक टाळली

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक शुक्रवारी (ता. ३) धुळ्यात पोचले. तेथून दोघांना पकडून गाडीत बसवत असतानाच धुळे पोलिस दलातील अधिकाऱ्याने प्रकरण हातात घेत टिमसह दोघा कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले.

त्यांची चौकशी करतो असे म्हणत दोघांनाही सोडून देण्यात आले. आता ते अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्नशील असून गॅरेजचालक भावाच्या अंगावर लोटून स्वतः सटकण्यासाठी तो पोलिस राजकीय व्यक्तींची मध्यस्थीसाठी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Jalgaon Crime News
Satara Crime News: सोने लुटणाऱ्या दोघा बिहारींना अटक

पाच वर्षापासूनचा धंदा

थेट पोलिस अधीक्षकांचेच नियंत्रण असलेल्या गुन्हे शाखेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा असतो. जिल्ह्यातून कुठलाही वाहन चोर पकडला, त्याच्याकडून वाहने जप्त झाली तर, ती मुद्देमाल म्हणून जमा न करता त्यांची थेट चोर बाजारातच विक्री केली जात होती.

तासाभरात पार्ट-पार्ट वेगळे करुन विल्हेवाट लावण्यात येत होती. त्यातही महागड्या ब्रॅण्डच्या गाड्यांचे इंजिन, चेचिस नंबर खोडून त्या स्वतः वापरासाठी ठेवण्यात येत होत्या. गेल्या चार-पाच वर्षांपासून धुळे एलसीबीच्या या कर्मचाऱ्यांतर्फे चोर-पोलिसांचे एकत्रित वाहन चोरीचे सिंडीकेट चालवले जात असल्याचे सांगण्यात आले.

‘ते’ पोलिस ‘कंट्रोल जमा’

जळगाव एलसीबीने कारवाई केली, एरंडोल पोलिस ठाण्यात धुळ पोलिस दलातील दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. असे असताना दहा दिवस उलटून दोघांना अटक करण्यात आलेली नसली तरी या प्रकरणावरुन या दोघा पोलिसांची धुळे नियंत्रण कक्षात बदली केल्याचेही वृत्त आहे.

"एरंडोल पोलिसांत वाहन चोरीच्या गुन्ह्यात गॅरेज चालकासह तीन दुचाकी वाहने जप्त असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे, ज्यांचा गुन्ह्यात सहभाग असले त्यांना अटक होईल."

- किशन नजन पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा जळगाव

Jalgaon Crime News
Jalgaon News : दवाखान्यातून तरुणी बेपत्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.