SAKAL Sting Operation : कंजरवाड्याने ‘ड्राय-डे’ केला ओलाचिंब; दारुचा भरला बाजार

Sting Operation : गांधी जयंतीचा ड्राय-डे कंजरवाडा, तांबापुरा, पाळधी आणि एमआयडीसीच्या भागात धुमधडाक्यात दारुची विक्री करण्यात आली.
A young man stops a car and gives a bottle of liquor. The streets are crowded with liquor sellers.
A young man stops a car and gives a bottle of liquor. The streets are crowded with liquor sellers.esakal
Updated on

जळगाव : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दारुविक्री बंद ठेवण्यात येते. जिल्ह्यातील हॉटेल्स-बियरबार, वाइनशॉप आणि दारुचे अनधिकृत गुत्तेही या दिवशी बंद ठेवण्याच्या सूचना संबंधित पेालिस ठाण्याकडून दिल्या जातात. असे असताना जळगाव शहरात गांधी जयंतीचा ड्राय-डे कंजरवाडा, तांबापुरा, पाळधी आणि एमआयडीसीच्या भागात धुमधडाक्यात दारुची विक्री करण्यात आली. ‘सकाळ’ने यासंदर्भात बुधवारी दुपारी ‘स्टींग ऑपरेशन’ केले.. या ऑपरेशनमध्ये ठिकठिकाणी दारू विक्री सर्रास सुरू असल्याचे निदर्शनास आले. (liquor sale on dry day at karanjwadi )

असा भरला बाजार

शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरापासून सिंधी कॉलनी शेजारील अंध शाळेपर्यंत सायंकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत दारु विक्रेत्यांनी जणू बाजारच मांडला होता. मुख्य रस्त्यांवर वाहने अडवून दारु पाहिजे का? अशी विचारणा करण्यात येत होती. सर्वत्र बियरबार-वाईनशॉप बंद असल्याने पेणार्यांसाठी ब्लॅकने दारु उपलब्ध करून देण्यात आली होती. दारु विक्रीसाठी तरुणांसह महिलाही 'पाहिजे' का? अशी विचारणा करून वाहने थांबवितांना दिसून आले.

‘फरदड’चे पाऊच

जाखनीनगर कंजरवाडा, तांबापुरा कंजरवाडा येथे सर्रास काळ्या गुळापासून हातभट्टीची दारू पाडली जाते. प्लास्टिक पाऊचमध्ये डेअरीवाला दूध देतो त्या पद्धतीने वीस रुपयांचे एक पाऊच या दराने कोरी दारुचे पाऊच येथे उपलब्ध होते. (latest marathi news)

A young man stops a car and gives a bottle of liquor. The streets are crowded with liquor sellers.
Sakal Sting Operation : ‘शिवशाही’चा प्रवास ठरतो जिवाशी खेळ

इंग्लिश ब्लॅकने विक्री

कंजरवाड्यात दोन शे रुपयांची क्वार्टर २६० रुपये, १८० ची बियर तीनशे रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होती. पिणाऱ्यांची होणारी गैरसोय होऊ नये म्हणून मागेल त्या ब्रॉण्डची दारू आदल्या दिवशीच साठवून हे विक्रेते दर वर्षी राजरोसपणे दारुची विक्री करुन रोजगार मिळवतात.

सर्वांना समान दर..

मोटारसायकल चालक असो की, कार चालक तो, दारु घेण्यासाठी थांबविला जातो. मग कोणता ब्रॅण्ड हवाय हे विचारल्यावर.. संबंधित विक्रेता त्यांना क्वार्टरचा दर सांगतो. सौदा झाल्यावर तो विक्रेता आधी पैसे हातात घेतो. घेणाऱ्याला तेथेच थांबायला सांगून माल आणायसाठी जातो. प्रामाणिकपणे मागेल तेवढ्या दारुच्या बॉटल्स आणून समोरच्याच्या हातात टेकवतो. लगेच दुसऱ्या ग्राहकाला थांबविण्यासाठी तो रस्त्याकडे वळतो.

इथे सुरू होती दारुविक्री

जाखनीनगर, कंजरवाडा, तांबापुरा, पिंप्राळा हुडको, गेंदालाल मील, एमआयडीसी परिसरातील कुसुंबा गावाकाडील भाग, गोदावरी अभियांत्रिकीजवळील टपऱ्या, पाळधी ढाबा आदी ठिकाणी ड्राय-डेच्या दिवशी सर्रास दारुची विक्री झाल्याचे आढळून आले.

A young man stops a car and gives a bottle of liquor. The streets are crowded with liquor sellers.
Operation Lotus : 'या' राज्यातलं काँग्रेसचं सरकार धोक्यात! 'भाजपकडून आमदारांना तब्बल 100 कोटी रुपयांची ऑफर'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.