Jalgaon Lok Adalat : एरंडोलच्या लोकअदालतीत 55 प्रकरणे निकाली! विविध प्रकरणांत तडजोडीअंती 17 लाख वसूल

Jalgaon News : तालुका विधी सेवा समितीतर्फे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ५५ प्रकरणे निकाली काढून १७ लाख १५ हजार ७४० रुपयांची तडजोड करण्यात आली.
Erandol National People's Court.
Erandol National People's Court.esakal
Updated on

Jalgaon News : तालुका विधी सेवा समितीतर्फे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ५५ प्रकरणे निकाली काढून १७ लाख १५ हजार ७४० रुपयांची तडजोड करण्यात आली. लोकअदालातीस दिवाणी न्यायाधीश ई. के. चौगुले हे पॅनलप्रमुख म्हणून तर पंच न्यायाधीश म्हणून ॲड. ए. टी. पाटील उपस्थित होते. राष्ट्रीय लोकअदालतीत २६ दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात येऊन १७ लाख २ हजार ८०१ रुपयांची तडजोड करण्यात आली. (Jalgaon Lok Adalat)

तसेच प्रलंबित प्रकरणांपैकी २९ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यामध्ये १२ हजार ९३९ रुपयांची तडजोड करण्यात आली. लोकअदालतीत एकूण ५५ प्रकरणे निकाली काढून १७ लाख १५ हजार ७४० रुपयांची तडजोड करण्यात आली. या वेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अरुण देशमुख, सचिव ॲड. एम. बी. देशमुख, सहाय्यक सरकारी अभियोक्ता डी. बी. वळवी, ॲड. पी. एस. बिर्ला.

ॲड. ए. एम. काळे, ॲड. एम. एम. महाजन, ॲड. डी. डी. पाटील, ॲड. जयेश पिलोरे, ॲड.ए. टी. पाटील, श्रीमती एस. ए. देसले, सहाय्यक अधीक्षक श्रीमती के. डी. नाकावे, श्रीमती एन. ए. बिऱ्हाडे, अंकित पुराणिक, पी. पी. भालेराव, नितीन बेडिस्कर, आर. आर. भोई, हवालदार सोनू पाचुंदे, कैलास हडप यांच्यासह वकील संघाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते. (latest marathi news)

Erandol National People's Court.
Jalgaon Server Down : रेशन धान्य वितरणात अडथळे! पारोळ्यात 39 टक्के लाभार्थी वंचित

जनजागृती अभियान

एरंडोल वकील संघ व न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयाचे न्यायाधीश ई. के. चौगुले अध्यक्षस्थानी होते. या वेळी न्यायाधीश चौगुले व ॲड. जयेश पिलोरे यांनी शिक्षणाचा अधिकार, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘लहान मुलांचे अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन केले.

वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अरुण देशमुख यांनी प्रास्ताविक केले. संघाचे सचिव ॲड. एम. बी. देशमुख यांनी सूत्रसंचलन केले. शिबिरास ॲड. आल्हाद काळे, ॲड. ए. टी. पाटील, डी. बी. वळवी, ॲड. एम. एम. महाजन, ॲड. पी. एस. बिर्ला यांच्यासह वकील संघाचे सदस्य, पक्षकार उपस्थित होते.

Erandol National People's Court.
Jalgaon Irrigation Scheme : प्रधानमंत्री सिंचाई योजनेत ‘पाडळसरे’चा समावेश होणार; वन विभागाने जागेला परवानगी दिली!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.