Jalgaon Lok Sabha Election : होम वोटिंग करून 107 वर्षांच्या आजी देवा घरी

Jalgaon News : पहूर कसबे येथील १०७ वर्षांच्या आजीने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘होम वोटिंग’ करून शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाचला अखेरचा निरोप घेतला.
Guntabai Bhivasane
Guntabai Bhivasaneesakal
Updated on

पहूर (ता. जामनेर) : पहूर कसबे येथील १०७ वर्षांच्या आजीने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘होम वोटिंग’ करून शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाचला अखेरचा निरोप घेतला. गुंताबाई भिला भिवसने या महेंद्रनगर येथे नातू गोपाल भिवसन यांच्यासोबत राहत होत्या. भारत निवडणूक आयोगाच्या ‘होम वोटिंग’ सुविधेद्वारा त्यांनी मतदान केले.

१३ मेस जिल्ह्यात सर्वत्र प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तत्पूर्वी ‘होम वोटिंग’ सुविधेद्वारे त्यांना मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडता आले असल्याचे सेक्टर ऑफिसर पी. एम. पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. (latest marathi news)

Guntabai Bhivasane
Jalgaon Lok Sabha: रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटलांच्या भेटीला! अक्षयतृतीयेचा मुहूर्त फळाला; पाटील होणार प्रचारात सक्रिय

त्यांनी ४ मेस मतदान केले. त्यांच्यासह अन्य तीन मतदारांनीही केले असल्याचे ते म्हणाले. रात्री नऊला वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसस्कार करण्यात आले. त्या १०७ वर्षांच्या होत्या. सुकदेव भिला भिवसने यांच्या त्या मातोश्री होत.

Guntabai Bhivasane
Jagaon Cotton Crop Insurance: जिल्ह्यात कापूस पीकविम्याच्या रकमेची प्रतीक्षा! शेतकरी संघटनेचा 30 जानेवारीचा ‘अल्टिमेटम’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.