Jalgaon Lok Sabha Code Of Conduct : जिल्ह्यात 51 हजारांवर फलक, झेंडे हटविले

Jalgaon Lok Sabha Code Of Conduct : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वत्र आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
hoardings (file photo)
hoardings (file photo)esakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Code Of Conduct : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वत्र आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार आचारसंहितेची घोषणा झाल्यापासून ७२ तासांत जळगाव लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील एकूण ३१ हजार ५६२ विविध राजकीय पक्षांचे बॅनर्स. (Jalgaon Lok Sabha Code Of Conduct 51 thousand placards flags were removed in district)

पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवण्यात आले आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील २० हजार १६६ बॅनर्स, स्टिकर्स, पोस्टर्स, झेंडे, हटविण्यात आले असून कोनशिला झाकण्यात आल्याची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमाची घोषणा १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने केल्यानंतर आचारसंहितेला सुरवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे.

दोन दिवसांतील कार्यवाही

आदर्श आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर २४ तासात जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघांतून काढलेले फलक जळगाव शहर - ५५, जळगाव ग्रामीण - २३४७, अमळनेर - ४०७, एरंडोल - २९१, चाळीसगाव - २५१७, तर पाचोरा - २४४५ असे एकूण ८०६२ बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटविण्यासोबतच कोनशिला झाकण्यात आल्या.

तर रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा मतदारसंघातून - १५९६, रावेर - ८३१, भुसावळ - ५८६, जामनेर - २९३१, मुक्ताईनगर - ४२, तर मलकापूर - ९८४ असे एकूण ६,९३४ बॅनर्स, झेंडे,पोस्टर्स तसेच कोनशिला झाकण्यात आल्या आहे. (latest marathi news)

hoardings (file photo)
Jalgaon News : सातपुड्यात वणव्याच्या घटनांमुळे वृक्षांची हानी; वन विभागाचे दुर्लक्ष

दोन दिवसांतील कार्यवाही

जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर - १६३, जळगाव ग्रामीण - ३९२३, अमळनेर - ११२५, एरंडोल - ४५५, चाळीसगाव - २७६६, तर पाचोरा - ४०२३ असे एकूण १२,४६३ विविध राजकीय पक्षांच्या जाहिराती असलेले पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे तसेच कोनशिला झाकण्यात आल्या.

रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा - ७७१, रावेर - ५४१, भुसावळ - ६४९, जामनेर - २१९५, मुक्ताईनगर - २५३, तर मलकापूर - ७३४ असे एकूण ५१२५ बॅनर्स, पोस्टर्स,झेंडे फलके हटविण्याचे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली.

गेल्या तीन दिवसांतील कार्यवाही

गेल्या ७२ तासात जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर - २२२, जळगाव ग्रामीण - ५२५८, अमळनेर - ११९७, एरंडोल - ५७०, चाळीसगाव - १४०८, तर पाचोरा - २३८२ असे एकूण ११,०३७ बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटविण्याचे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा - ३२७३, रावेर - ४९१, भुसावळ - ३६०, जामनेर - ३२६६, मुक्ताईनगर - ३४६, तर मलकापूर - ३७१, असे एकूण ८१०७ बॅनर्स,पोस्टर्स, झेंडे, तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली.

hoardings (file photo)
Nashik Lok Sabha Election : जिल्ह्याच्या विकासासाठी 17 खासदारांचेही योगदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.