Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात 20, रावेर मतदारसंघात 29 उमेदवार

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघात चार, तर रावेर लोकसभा मतदारसंघात दोन, असे एकूण सहा उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी (ता. २६) झालेल्या छाननीत अवैध ठरले.
Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency esakal
Updated on

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघात चार, तर रावेर लोकसभा मतदारसंघात दोन, असे एकूण सहा उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी (ता. २६) झालेल्या छाननीत अवैध ठरले. रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रवींद्र पाटलांसह सहा जणांचे अर्ज अवैध ठरले. जळगाव लोकसभा मतदारसंघात २०, तर रावेर लोकसभा मतदारसंघात २९ उमेदवार रिंगणात आहेत. (Jalgaon Lok Sabha Constituency)

शनिवारी (ता. २७) व रविवारी (ता. २८) शासकीय सुटी आहे. सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस अन्‌ त्यात सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत, असे केवळ चारच तास माघारीला मिळणार आहेत. या चार तासांत दोन्ही मतदारसंघातून कोण माघारी घेतो, याकडे उमेदवारांसह मतदारांचे लक्ष लागून आहे.

माघार न झाल्यास दोन यंत्रे लागणार

एका लोकसभेसाठी मतदान यंत्रात १५ उमेदवार व एक ‘नोटा’, असे सोळा बटन असतात. जळगाव मतदारसंघात २०, तर रावेर मतदारसंघात २९ उमेदवार रिंगणात आहेत. जळगावमध्ये पाच, तर रावेरमध्ये १४ उमेदवारांनी माघार घेतली तरच एक मतदान यंत्र लागेल, अन्यथा निवडणूक यंत्रणेला दोन मतदान यंत्रे लावावी लागतील.

अर्ज अवैध ठरलेले उमेदवार

जळगाव लोकसभा मतदारसंघात अंजली करण पाटील, ईशान राठोड व मोहसीन खान (अपक्ष), ज्ञानेश्‍वर गोसावी यांचे अर्ज अवैध ठरले. अंजली पवार (शिवसेना उबाठा) डमी उमेदवार होत्या. श्री. खान व गोसावी यांचे सूचक जळगाव लोकसभा मतदारसंघातील असायला हवे होते. ते रावेर लोकसभा मतदारसंघातील होते. त्यासाठी त्यांचे अर्ज अवैध ठरले.

रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे डमी उमेदवार रवींद्र पाटील यांच्या अर्जासोबत पक्षाचा ‘ए’‘बी’ फॉर्म नव्हता. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाने श्रीराम पाटील यांना ‘ए’‘बी’ फॉर्म दिला होता. (Latest Marathi News)

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Election : जळगावात 45, रावेरसाठ 36 अर्ज दाखल; जिल्हाधिकारी कार्यालयास यात्रेचे स्वरुप

अपक्ष उमेदवार गयासोद्दीन काझी यांनी प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपरवर करणे गरजेचे होते. त्यांना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र शुक्रवारी सकाळी अकरापर्यंत आणून देण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी दुपारी साडेबाराला आणले. तोपर्यंत अर्जांची छाननी झाली होती. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला.

सात उमेदवारांवर गुन्हे

प्रतिज्ञापत्रानुसार जळगाव लोकसभा मतदारसंघातील पाच उमेदवारांवार गुन्हे दाखल आहेत. त्यात ललितकुमार शर्मा (अपक्ष), युवराज जाधव (वंचित बहुजन आघाडी), संग्रामसिंग सूर्यवंशी (अपक्ष), ईश्‍वर मोरे (सैनिक समाज पार्टी), नामदेव कोळी (अखिल भारत हिंदू महासभा) यांचा समावेश आहे.

त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वेळा वृत्तपत्रात ‘मी उमेदवार आहे आणि माझ्यावर गुन्हा दाखल आहे’, अशा आशयाची जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे. राजकीय पक्ष असेल, तर त्या पक्षांनीही तशीच जाहिरात द्यावी लागेल. रावेर मतदारसंघातील कोमलबाई पाटील, सागर पाटील (अपक्ष) यांच्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांनाही तीन वेळा गुन्हे दाखल असल्याबाबत जाहिरात द्यावी लागेल.

वैध ठरलेले उमेदवार

जळगाव लोकसभा मतदारसंघ : करण बाळासाहेब पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), विलास शंकर तायडे (बहुजन समाज पार्टी), स्मिता उदय वाघ (भारतीय जनता पक्ष), ईश्वर दयाराम मोरे (सैनिक समाज पार्टी), नामदेव पांडुरंग कोळी (अखिल भारत हिंदू महासभा), युवराज भिमराव जाधव (वंचित बहुजन आघाडी), अब्दुल शकूर देशपांडे.

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Election : ‘चला हो मतदान करू चला..’ गीताला हजारो ‘व्ह्यूज’

अहमद खान युसूफ खान, करण संजय पवार, पाटील संदीप युवराज, प्रदीप शंकर आव्हाड, डॉ. प्रमोद हेमराज पाटील, महेंद्र देवराम कोळी, मुकेश मूलचंद कोळी, रोहित दिलीप निकम, ललित गौरीशंकर शर्मा, लक्ष्मण गंगाराम पाटील, ॲड. बाबूराव तुकाराम दाणेज, संग्रामसिंग सुरेश सूर्यवंशी-पाटील, संजय एकनाथ माळी (सर्व अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले.

रावेर मतदारसंघ : रक्षा निखिल खडसे (भारतीय जनता पक्ष), विजय रामकृष्ण काळे (बहुजन समाज पार्टी), श्रीराम दयाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट), अशोक बाबूराव जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक), गुलाब दयाराम भिल (भारती आदिवासी पार्टी), नाजमीन शेख रजमान (सर्वसमाज जनता पार्टी).

वसंत शंकर कोलते (बहुजन मुक्ती पार्टी), संजय पंडित ब्राह्मणे (वंचित बहुजन अघाडी), संजयकुमार लक्ष्मण वानखेडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशल), अनिल पितांबर वाघ, अमित हरिभाऊ कोलते, प्रा. डॉ. आशिष सुभाष जाधव, एकनाथ नागो साळुंके, कोमलबाई बापूराव पाटील, जितेंद्र पांडुरंग पाटील, नितीन प्रल्हाद कांडेलकर, प्रवीण लक्ष्मण पाटील, भिवराज रामदास रायसिंगे.

ममता ऊर्फ मुमताज भिकारी तडवी, युवराज देवसिंग बारेला, डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते, रऊफ युसूफ शेख, राहुलरॉय अशोक मुळे, श्रीराम ओंकार पाटील, श्रीराम सीताराम पाटील, शेख आबिद शेख बशीर, शेख कुर्बान शेख करीम, सागर प्रभाकर पाटील, संजय प्रल्हाद कांडेलकर (सर्व अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Election : शिरूरच्या मैदानात प्रचारासाठी उतरली ‘मुक्ताईची लेक’; ॲड. रोहिणी खडसेंचा शिक्रापूरला सभांचा धडाका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.