Jalgaon Lok Sabha Constituency : जिल्ह्यातील दोन्ही सोप्या लढती भाजपने केल्या कठीण; रावेर, जळगावातील स्थिती

Lok Sabha Constituency : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या यादीत जळगाव जिल्ह्यातील जळगावसह रावेरच्या उमेदवारीची घोषणा झाली.
Raksha Khadse, Smita Wagh, Shriram Patil, Karan Pawar
Raksha Khadse, Smita Wagh, Shriram Patil, Karan Pawaresakal
Updated on

Jalgaon News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या यादीत जळगाव जिल्ह्यातील जळगावसह रावेरच्या उमेदवारीची घोषणा झाली. प्रतिस्पर्धी गटातील उमेदवार ठरण्याच्या सुमारे तीन आठवडे आधीच दोघाही भाजप उमेदवारांचा प्रचार सुरु झाल्याने दोन्ही ठिकाणी सोपी वाटणारी लढत भाजपतील अंतर्गत मतभेद, गटबाजी आणि पक्षनेत्यांच्या चुकीच्या नियोजनाने कठीण होऊन बसली, असे आता बोलले जात आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

या दोन्ही जागाबाबत भाजपनेते तथा मंत्री गिरीश महाजन ४-५ लाखांच्या मताधिक्याचा तर पक्षातील पदाधिकारीही दीड- दोन लाखांच्या मताधिक्याची गणिते मांडत असली तरी, दोन्ही ठिकाणी झालेली ‘कांटे की टक्कर’ पाहता जागा आल्या तरी मताधिक्य किरकोळ राहील, किंबहुना धक्कादायक निकालाचे चित्रही पाहायला मिळू शकते, अशी स्थिती आहे.

प्रचाराला अतिरिक्त वेळ, पण..

भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या दुसऱ्याच यादीत जळगावसाठी स्मिता वाघ व रावेरला विद्यमान खासदार रक्षा खडसेंचे नाव जाहीर करण्यात आले. प्रतिस्पर्धी गटातील उमेदवार ठरलेले नसताना भाजपने उमेदवारी घोषित करण्यात आघाडी घेतली. त्यामुळे या दोघा उमेदवारांना जवळपास तीन आठवडे अतिरिक्त वेळ प्रचाराला मिळाला. तुलनेने जळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार व रावेरला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांची उमेदवारी फार उशीरा जाहीर झाली.

तिकीट कापले जाण्याची भाजपतच अंतर्गत चर्चा

भाजपच्या दोघा उमेदवारांनी प्रचारही जोरात सुरु केला. मात्र, २०१४ ला रावेरमध्ये व २०१९ ला जळगाव मतदारसंघात उमेदवारी जाहीर करुन ऐनवेळी ती रद्द करण्याच्या प्रचाराचा दाखला देत भाजपच्या अंतर्गत गटांमध्येच या दोन्ही ठिकाणच्या उमेदवारींबाबत काहीही होऊ शकते, अशी चर्चा सुरु झाली. तरीही स्मिता वाघ व रक्षा खडसेंनी त्यांचे प्रचाराचे काम सुरुच ठेवले. (latest marathi news)

Raksha Khadse, Smita Wagh, Shriram Patil, Karan Pawar
Jalgaon Lok Sabha Election: 4 जूनला अगोदर टपाली मोजणी! जळगाव, रावेर लोकसभेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; पोलिस बंदोबस्त राहणार

अपेक्षित लाभ घेता आला नाही

सर्वांत आधी जाहीर झालेली उमेदवारी, प्रचाराला मिळालेला अतिरिक्त वेळ, प्रतिस्पर्धी पक्षातील उमेदवार निश्‍चित नसणे व यासह विरोधी पक्षांमधील एकूणच संघटनात्मक कमी व बुथरचनेचा अभाव या साऱ्या बाबी भाजपच्या पथ्यावर पडणाऱ्या ठरायला हव्या होत्या. मात्र, या गोष्टींचा अपेक्षित लाभ दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना घेता आला नाही.

तीनही मंत्र्यांची उदासीनता

भाजपसोबत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस , रिपाईं (आठवले गट) यासह अन्य पक्षांची महायुती असताना जिल्ह्यातील भाजपच्या गिरीश महाजनांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दोन्ही मतदारसंघांमध्ये जोमाने काम केल्याचे दिसून आले नाही. त्यांच्या समर्थकांनी कितीही दावा केला असला तरी या तीनही मंत्र्यांची उदासीनता लपून राहिलेली नाही.

‘रावेर’वर तर अन्यायच!

रावेरच्या जागेबाबत तर या तीनही मंत्र्यांनी अन्यायच केला. रक्षा खडसेंच्या प्रचारार्थ तीनही मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्याची सभा, रॅली रावेर मतदारसंघात झाली नाही. गिरीश महाजनांचे जामनेर, रावेर मतदारसंघात असूनही महाजन रावेर शहरातील नवनीत राणांच्या ‘रोड शो’ला लावलेल्या हजेरीपुरतेच मर्यादित राहिले. इतरत्र ते फिरकलेही नाहीत. एकनाथ खडसेंनी स्नुषा रक्षा यांच्या पाठिमागे बळ उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना या मतदारसंघात सभा घेण्यातही अडथळे आणण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Raksha Khadse, Smita Wagh, Shriram Patil, Karan Pawar
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात मतदानाचा वाढलेला साडेचार टक्का कुणाला फायदा देणार?

हे मुद्दे ठरणार परिणामकारक...

- प्रचारात आघाडी, पण टिकवता आली नाही

- मोदींच्या गॅरंटीवरच अवलंबून

- स्थानिक मुद्यांपासून प्रचार ठेवला दूर

- संघटन मजबूत, पण गटबाजीचा प्रभाव

- व्यक्तिगत हेवेदाव्यांचा प्रचारावर परिणाम

- खडसेंना सभा घेण्यापासून रोखणे

नयन मोंगिया अन्‌ जळगाव भाजप

भारतीय क्रिकेट संघात साधारण दशकापूर्वी नयन मोंगिया नावाचा यष्टीरक्षक होता. गोलंदाजांसह मैदानावरील खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे काम तो इमाने इतबारे करायचा. मात्र, बऱ्याचदा आवश्‍यक नसताना झेपावून झेल घेण्याची त्याची सवय होती.

त्यावरुन ज्येष्ठ क्रिकेट विश्‍लेषक तथा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी मोंगियाबाबत बोलताना नेहमीच ‘तो सोपा झेल कठीण करुन घेतो.’ असे उपहासाने म्हणायचे. जळगाव भाजपने जळगाव व रावेरच्या जागांवरील लढतींमध्ये नेमके हेच करुन ठेवल्याचे एकूणच स्थितीवरुन दिसून येत आहे .

Raksha Khadse, Smita Wagh, Shriram Patil, Karan Pawar
Jalgaon Lok Sabha Constituency : रावेरला भावजयीविरोधात, बारामतीत नणंदेच्या प्रचारात! मुक्ताईनगरच्या लेकीचे योगदान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.