Jalgaon Lok Sabha Constituency : मलकापूरमुळे खानदेशचा विदर्भाशी राजकीय ‘कनेक्ट’; ‘रावेर’मध्ये जिल्ह्याबाहेरचा भाग

Lok Sabha Constituency : मलकापूर तालुक्याच्या हद्दीत केव्हा प्रवेश करतो हे समजणे कठीण.. पण एक तालुका खानदेशातला, तर दुसरा विदर्भाचे प्रवेशद्वार.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituencyesakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Constituency : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरुन प्रवास करताना मुक्ताईनगराची हद्द सोडून मलकापूर तालुक्याच्या हद्दीत केव्हा प्रवेश करतो हे समजणे कठीण.. पण एक तालुका खानदेशातला, तर दुसरा विदर्भाचे प्रवेशद्वार. खानदेश अन्‌ विदर्भाला राजकीयदृष्ट्या जोडून ठेवणारा मलकापूर विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा क्षेत्रात येत असल्याने इथल्या उमेदवारांना विदर्भातील मलकापूरसह थेट नांदुऱ्यापर्यंत नातेसंबंध जपणे आणि संपर्क ठेवणे महत्त्वाचे ठरते. ()

रावेर लोकसभा मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यात नेहमीच चर्चेचा ठरतो, तसा तो यंदाच्या निवडणुकीतही गाजत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या प्रभावाखालच्या क्षेत्रातून दोन टर्मपासून त्यांच्या स्नुषा श्रीमती रक्षा खडसे खासदार आहेत. या वेळी सलग तिसऱ्यांदा त्यांना भाजपने उमेदवारी देऊ केली आहे.. याचदरम्यान खडसेंचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश होऊ घातल्याने हा मतदारसंघ राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

खानदेश- विदर्भ कनेक्शन

२००९च्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेत रावेर लोकसभा क्षेत्र नव्याने अस्तित्वात येऊन पूर्वीच्या जळगाव लोकसभा क्षेत्रातील ८० टक्के भाग त्यात समाविष्ट झाला. त्यात भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, रावेर असे जळगाव जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ तर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा मुक्ताईनगरला लागून असलेला विधानसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. खानदेशला विदर्भाशी जोडणाऱ्या महामार्ग क्रमांक ५३ वरील मलकापूर व थेट नांदुऱ्यापर्यंत रावेर लोकसभा क्षेत्राची व्याप्ती आहे.(latest marathi news)

Lok Sabha Constituency
Hingoli Lok Sabha constituency : हिंगोली मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात; १५ अपक्षांनी घेतली माघार

भौगोलिक, सामाजिक रचना सारखीच!

रावेर मतदारसंघातील भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यांची भौगोलिक व सामाजिक रचना मलकापूरशी साम्य साधते. या भागातील जे प्रश्‍न आहेत, तेच मलकापूर मतदारसंघातील. कापूस उत्पादक तालुका म्हणून मलकापूरचीही ओळख. जीनिंग, प्रेसिंग मिल याठिकाणी भरपूर. जळगाव जिल्ह्यातील विशेषत: लेवा पाटीदार समाजाचे नातेसंबंध मलकापूर तालुक्यात आणि पुढे अकोल्यापर्यंत आहेत. त्यामुळे रावेरच्या उमेदवाराला मलकापूर- नांदुऱ्यापर्यंत नातेसंबंधही जोपासावे लागतात, मित्रपरिवारही जवळ करावा लागतो आणि संपर्कही कायम ठेवावा लागतो.

उमेदवारी नाही, तरी संपर्क

उमेदवार असोत की राजकीयदृष्ट्या नशीब आजमावणारे नेते अथवा अगदी व्यावसायिकही या मतदारसंघात आपला संपर्क ठेवत असतात. गोदावरी फाउंडेशन व वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा क्षेत्रात असलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश करुन महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या त्यांच्या कन्या डॉ. केतकी यांचाही या भागात नेहमीच संपर्क असतो. मलकापूर हे तर डॉ. केतकी यांचे सासर. म्हणून त्यांचीही या तालुक्यावर विशेष मर्जी असल्याचेच दिसून येते.

Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency : शिवसेना ठाकरे पक्ष भाजपसमोर उभे करणार कडवे आव्हान

हनुमानाचे दर्शन हवेच!

खानदेश, विदर्भाला राजकीयदृष्ट्या जोडून ठेवणाऱ्या मलकापूर विधानसभा क्षेत्रात उमेदवाराला प्रचार करायचा असेल तर सकाळी निघाल्यानंतर परतायला थेट रात्रच होणार. अगदी, रावेर- मुक्ताईनगरातून निघून प्रवास केला तरी हीच स्थिती. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून प्रवासाला वेळ लागत नसला तरी या मार्गावर गावांची संख्या चांगली आहे, त्यामुळे थांबत थांबतच प्रवास करावा लागतो.

थेट नांदुऱ्यापर्यंत जायचे तर त्यालगत १०५ फुटी उंचीच्या भव्य हनुमानाचे दर्शन घ्यावेच लागेल. हा हनुमानच मग उमेदवाराला तारुन नेतो, अशी श्रद्धा. म्हणून रावेर मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रांसोबतच मलकापूरचे महत्त्व तसूभरही कमी नाही. याची जाणीव असल्यानेच उमेदवार या मतदारसंघावर ‘फोकस’ केल्याशिवाय राहत नाहीत.

Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे रविंद्रभैय्या, श्रीराम पाटील की चौधरी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.