Jalgaon Loksabha Election: जळगाव लोकसभा मतदारसंघाचा पेच वाढणार? कुणाच्या पदरात पडणार जागा, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Loksabha Election : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजायला काही दिवसांचाच अवधी असताना जळगाव मतदारसंघाचा तिढा मात्र वाढला आहे
NCP, BJP, Shivsena, Congress
NCP, BJP, Shivsena, Congressesakal
Updated on

अमळनेर : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजायला काही दिवसांचाच अवधी असताना जळगाव मतदारसंघाचा तिढा मात्र वाढला आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी (BJP, Shivsena, NCP) या तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा केल्याचे बोलले जात असून, यातून कुणाच्या पदरात ही जागा पडते, याविषयी उत्सुकता वाढली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जळगावच्या जागेसाठी सरसावला असून, त्यांनी त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency election marathi news)

राज्यातील सत्तासंघर्षात पहिल्यांदाच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. राज्यातील ४८ पैकी जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार तिन्ही पक्षांनी केला असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. यातच जळगाव लोकसभेची जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) पुढे सरसावला असून, त्यांनी तयारी सुरू केली आहे.

विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी सलोख्याचे संबंध आहेत. मात्र त्यांना होम पिचवरूनच (चाळीसगाव) पक्षांतर्गत विरोध होत आहे. तसेच त्यांचे जिल्ह्यातील भाजपच्या मंत्र्यांशी पाहिजे तसे सख्य नाही, हेही सर्वश्रुत आहे.

यातच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात येणार असल्याची चर्चा असून, जळगाव लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास ती जिंकण्याचा निर्धार मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. मंत्री पाटील यांच्याकडे जळगाव लोकसभा मतदारसंघाची सूत्रे आल्यास ते खानदेशात राष्ट्रवादीची ताकद वाढवू शकतात. (Latest Marathi News)

NCP, BJP, Shivsena, Congress
Kolhapur Politics : मुरलीधर जाधव आणि चंद्रदीप नरके यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जयश्री पाटील यांचे नाव आघाडीवर

राष्ट्रवादीकडून अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील प्रबळ दावेदार मानल्या जातात. जयश्री पाटील यांनी आतापर्यंत विविध राजकीय पदे भूषविली असून, मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरू आहे.

केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरणाच्या धोरणाला अनुसरून जास्तीत जास्त महिलांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीकडून जयश्री पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. मंत्री अनिल भाईदास पाटील खानदेशातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते असल्याने त्यांनी राज्याच्याच राजकारणात राहावे, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा असल्याने अनिल पाटील पुन्हा विधानसभाच लढवतील यावर जणू शिक्कामोर्तब झाले आहे.

NCP, BJP, Shivsena, Congress
Maharashtra Politics: भाजपची पुन्हा मोठी खेळी? शरद पवारांच्या जवळच्या नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()