Jalgaon Lok Sabha Constituency : मंगेश चव्हाण- उन्मेष पाटलांची लागली कसोटी; चाळीसगावकडे जिल्ह्याचे लक्ष

Lok Sabha Constituency : यंदाच्या जळगाव लोकसभा निवडणुकीत चाळीसगाव तालुका लक्षवेधी ठरला होता. त्याला कारणही तसेच होते.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituency esakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Constituency : यंदाच्या जळगाव लोकसभा निवडणुकीत चाळीसगाव तालुका लक्षवेधी ठरला होता. त्याला कारणही तसेच होते. येथील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना पक्षाने लोकसभेची उमेदवारी न दिल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यावर लोकसभेची ही निवडणूक आणखी लक्षवेधी ठरली. ( Mangesh Chavan Unmesh Patil has test in election )

या निवडणुकीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे उमेदवार स्मिता वाघ यांच्या विजयासाठी सर्व शक्तिनिशी उतरले होते. उन्मेष पाटील हेही करण पाटलांच्या प्रचारात आघाडीवर होते. त्यामुळे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात दोन्हींकडून आपापल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करण्यात आल्याने गेल्या वेळी जशी एकतर्फी निवडणूक झाली होती, तशी यंदा झाली नाही. परिणामी, जो कोणी उमेदवार निवडून येईल, तो कमी मताधिक्याने निवडून येईल, असे एकंदरीत चित्र होते.

या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी प्रशासनातर्फे व्यापक जनजागृती करण्यात आली होती. विविध राजकीय पक्षांनीही मतदान वाढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्याला फारसे यश आल्याचे दिसून आले नाही. मागील निवडणुकीपेक्षा यंदा टक्केवारी वाढली असली, तरी ती ज्या पद्धतीने वाढली पाहिजे होती, तेवढे मतदान झाले नाही.

तालुक्यातील तीन लाख ६१ हजार ३८ मतदारांपैकी दोन लाख ११ हजार ५१ मतदारांनी मतदान केल्याने एकूण ५८.४६ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी न वाढण्याला वाढत्या उन्हाचे एक कारण असले, तरी या निवडणुकीबद्दल मतदारांमध्ये असलेली उदासीनता हेही एक महत्त्वाचे कारण दिसून आले.

शहरी भागात तसा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या तुलनेत ग्रामीण भागात काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात, तर काही गावांमध्ये अतिशय कमी मतदान झाले. मुस्लिमबहुल भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे हे मतदान मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जास्त झाल्याचे दिसून आले. (latest political news)

Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभेतील वाढलेला टक्का कुणाला ठरणार फायदेशीर?

मोदी लाटेचा अभाव

गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार उन्मेष पाटील यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली, त्याला ‘मोदी लाट’ हे एक महत्त्वाचे कारण होते. जे त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही अनेकदा मान्य केले आहे. तशी लाट यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आली नाही. चाळीसगाव तालुका तसा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत मात्र भाजपने जशी प्रचारात आघाडी घेतली होती, तशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही घेतली होती.

भाजपच्या स्मिता वाघ यांच्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी संपूर्ण मतदारसंघच जणू पिंजून काढला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ते प्रचारात राहिले. उन्मेष पाटील हेही तशाच पद्धतीने करण पाटलांच्या प्रचारार्थ फिरले. या निवडणुकीत ‘मोदी लाट’ नसल्याने त्याचा भाजपच्या मतांवर निश्‍चितपणे परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

विजयाची प्रचंड उत्सुकता

या निवडणुकीत भाजपच्या स्मिता वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करण पाटील यांच्यात सुरवातीपासूनच चुरस निर्माण झालेली असल्याने या दोन्हींपैकी कोण विजयी होतो, याची प्रचंड उत्सुकता तालुक्यात आहे. सध्या उन्मेष पाटील व मंगेश चव्हाण या एकेकाळच्या दोन्ही मित्रांमध्ये प्रचंड मतभेद निर्माण झाले आहेत.

आता तर दोघेही वेगवेगळ्या पक्षांमध्ये असल्याने भविष्यात त्यांच्यात आणखीनच चुरस राहील. दोघांनी आपापल्या उमेदवारांचा सर्वशक्तिनिशी प्रचार केला आहे. त्यामुळे ‘वनसाईड’ मतदान झालेले नाही. मतदानानंतर अनेक केंद्रांवर ‘फिफ्टी-फिफ्टी’ झाल्याचे जनसामान्यांमधून सांगितले जात होते. या निवडणुकीतून उमेदवाराला मिळणारा कल आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी निर्णायक ठरेल, एवढे मात्र निश्‍चित.

Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency : मतदानाचा वाढीव टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.