Jalgaon Lok Sabha Constituency : नणंद-भावजयीच्या शाब्दीक युद्धाने पेटले रण

Lok Sabha Constituency : महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर आणि त्यांच्या भावजयी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू आहे.
Raksha Khadse, Rohini Khadse
Raksha Khadse, Rohini Khadseesakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Constituency : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर आणि त्यांच्या भावजयी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू आहे. लोकसभेच्या मतदानापर्यंत हा सामना पुढे वाढणार की थांबणार, याकडे जनतेचे लक्ष आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency raksha khadse and rohini khadse war of words ignited battle marathi news)

रावेरमध्ये भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीतर्फे खासदार रक्षा खडसे; तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीतर्फे श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रक्षा खडसे या आमदार एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. श्री. खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली.

त्याचवेळी त्यांच्या कन्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपण पक्ष न सोडता, पक्षातच राहून कार्य करणार आहोत, असे जाहीर करून राजकीय क्षेत्रात सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील यांच्यात लढत असली, तरी खडसे घराण्यातील अंतर्गतही आता ही लढत रंगू लागल्याचे दिसत आहे.

रक्षा खडसे यांना भाजपची भक्कम साथ आहे. त्यातच सासरे एकनाथ खडसे यांनीही भाजपत प्रवेश करण्याची घोषणा करून त्यांना आणखी बळ दिले. दुसरीकडे रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी तेवढ्याच ताकदीने उभ्या ठाकल्या आहेत. केवळ रावेर मतदारसंघात नव्हे, तर त्या राज्यातील पक्षाच्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभेत सहभागी होऊन भाजपवर हल्ला करीत आहेत.  (latest marathi news)

Raksha Khadse, Rohini Khadse
Jalgaon Lok Sabha Constituency : ‘ए.टीं’च्या गाठीभेटी; वाघांची धाकधूक!

रावेरमध्ये नणंद-भावजय यांचे एकमेकांविरुद्ध शाब्दीक वादही सुरू आहेत. रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसे याही भाजपमध्ये येतील, असे वक्तव्य केले होते. त्याला रोहिणी खडसे यांनी तेवढ्याच बाणेदारपणे उत्तर देत आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाही, आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर राहणार आहोत. शरद पवार यांच्याबरोबरच काम करणार आहोत.

मुक्ताईनगर विधानसभेत आपण याच पक्षातर्फे उमेदवारी करणार आहोत, असे सांगून टाकले. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी रक्षा खडसे यांच्यावर हल्ला चढवत म्हटले, की रक्षा खडसे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात येण्याची वेळ येऊ शकते. भविष्य कुणीही काही सांगितलेले नाही. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकते. त्याला रक्षा खडसे यांनी उत्तर दिले आाहे.

त्या म्हणाल्या, की मला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जायची कधीच वेळ येणार नाही. आपण यापूर्वीच सांगितले आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जायचे असते, तर दोन वर्षांपूर्वीच गेली असती. किंवा वर्षभर आधीच गेली असती. मला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाण्यात कोणताही ‘इंट्रेस’ नाही, मी भाजपची कार्यकर्ती आहे, आणि सक्षमपणे माझ्या पक्षाचे काम करणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांचा हा वाद थांबणार की आणखी वाढणार, हे पुढे दिसून येईल. त्यामुळे निवडणुकीपेक्षा या वादाकडेच जनतेच लक्ष असल्याचे दिसत आहे.

Raksha Khadse, Rohini Khadse
Jalgaon Lok Sabha Constituency : भाजप या वेळी विजयात ‘पास’ होणार की ‘फेल’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.